गद्दारांसाठी दारं कायमची बंद : संजय राऊत

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
मुंबई, 
शिंदे गटात प्रचंड बेबनाव आहे. मात्र, गद्दारांसाठी आमचे दरवाजे बंद असतील. त्यांना परत घेणे म्हणजे निष्ठावंत शिवसैनिकाचा अपमान होईल, असे मत उद्धव ठाकरे गटाचे नेते Sanjay Raut संजय राऊत यांनी व्यक्त केले. राऊत म्हणाले, फक्त पैशाला महत्त्व देणारे सोडून गेले, पण कोणीही तेथे आनंदी नाहीत. किर्तीकर तरी कुठे आनंदी आहेत. शिंदेचीही गरज संपली आहे. तेदेखील आता बाजूला जातील. आता या गद्दारांवर ‘खोका स्टोरी’ चित्रपट येणार आहे.
 
 
Sanjay Raut
राऊत स्वतः गद्दार : शिरसाट
आम्हाला गद्दार ठरवणारे हे आहेत कोण, ते स्वतः गद्दार आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना जशासतसे उत्तर दिले. सुपारी घेऊन प्रामाणिपणे उबाठा गट संपवला, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस संपविली. सुपारी घेऊन गद्दारी करणारा खरा गद्दार Sanjay Raut संजय राऊत आहे. त्यानी आम्हाला स्वाभिमान वगैरे शिकवू नये, अशा शब्दांत शिरसाटांनी राऊतांना फटकारले. आम्ही कुठे जाणार नाही, जाण्याची गरजच नाही. तुमचे उरलेले दोन-तीन आहात, ते तुम्ही सांभाळा. तेदेखील आमच्याकडे येत आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.