शरद पवार गटाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
मुंबई, 
Sharad Pawar group : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार गटाने आपल्या 40 स्टार प्रचारांकांची यादी जाहीर केली आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता शरद पवार गटानेही आपली स्टार प्रचारकांची यादी घोषित केली असून, यात शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश आहे.
 

Sharad Pawar group 
 
या यादीत पी. सी. चाको, फौजिया खान, वंदना चौहान, धीरज शर्मा, सिराज मेहंदी, शब्बीर विद्रोही, सोनिया दुहान, राजेश टोपे, यशवंत गोसावी, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, पार्थ पोळके, जयदेव गायकवाड, अशोक पवार, शशिकांत शिंदे, अरुण लाड, प्राजक्त तनपुरे, सुनील भुसारा, नसीम सिद्दीकी, विकास लवांडे, रोहित आर. पाटील, राजू आवळे, रोहिणी खडसे, मेहबूब शेख, प्रकाश गजभिये, रवी वर्पे, पंडित कांबळे, नरेंद्र वर्मा, राज राजापूरकर, संजय काळबांडे, जावेद हबीब, सक्षणा सलगर, पूजा मोरे यांचाही समावेश आहे.