आता संसदेलाही ‘रामा'ची वाट !

ShriRam-Arun Govil-Meerut ‘रामा"ची संसदेत हजेरी

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
वेध
 
 
- विजय निचकवडे
ShriRam-Arun Govil-Meerut राजकारणी हा चांगला कलाकार असतो, पण कलाकाराला राजकारण पचनी पडेलच असे नाही. तरीही काही जणांनी आज त्यांच्या भूमिकांमुळे राजकारणातील महत्त्व सिद्ध केले आहे. ShriRam-Arun Govil-Meerut म्हणूनच तर आमच्या संसदेत ‘हनुमान', ‘सीता', ‘रावण' पोहोचू शकले. आता तर चक्क ‘रामा'नेही संसदेची वाट धरली असून ४ जूननंतर संसदेत रामराज्याची संकल्पपूर्ती होणार, असा विश्वास व्यक्त होत आहे. ShriRam-Arun Govil-Meerut एक कलाकार म्हणून भूमिका निभविता, त्या भूमिकाच परिवर्तनासाठी कारणीभूत ठरतात, हे तेवढेच खरे! जरा आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. आज आमच्या संसदेत रामा आधी सीता, हनुमान आणि रावण पोहोचले आहेत. ShriRam-Arun Govil-Meerut म्हणजेच काय तर रामायणात माता सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया, हनुमान म्हणजे दारासिंग आणि रावणाच्या भूमिकेतील अरविंद त्रिवेदी भारताच्या संसदेत खासदार म्हणून वेगवेगळ्या मतदार संघांतून पोहोचले आहेत. विशेष म्हणजे या सर्वांना भाजपाचे उमेदवार म्हणून मतदारांनी सभागृहात पाठविले.ShriRam-Arun Govil-Meerut
 
 
 
ShriRam-Arun Govil-Meerut
 
 
आता रामायणातील या तीन महत्त्वाच्या व्यक्तिरेखांच्या पाठोपाठ साक्षात प्रभू श्रीरामही म्हणजे रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल याच मार्गावर आहेत. ShriRam-Arun Govil-Meerut लोकांच्या मनातील भाव ओळखून कायमच भाजपाने अशा कलावंतांना राजकीय पटलावर यशस्वी करून दाखविले आहे. रामाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अरुण गोविल यांना भाजपाने मेरठमधून उमेदवारी दिली. आता रामच निवडणूक रिंगणात असतील तर त्यांचा संसदेचा मार्ग कोणी रोखू शकेल का? आज देशातील वातावरण राममय आहे. ShriRam-Arun Govil-Meerut प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य-दिव्य अशा मंदिरात विराजमान झाले आहेत. कोट्यवधी रामभक्तांचे डोळे आजही रामललाच्या त्या विलोभनीय रूपास डोळ्यात साठविण्यासाठी आसुसले आहेत. अशावेळी रामच साक्षात निवडणुकीच्या रिंगणात असतील तर मतदारांचे आशीर्वाद नक्कीच त्यांच्या पाठीशी असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्यांना पाहून आम्ही लहानाचे मोठे झालो.
 
 
 
ShriRam-Arun Govil-Meerut मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रभू श्रीरामांची जी छबी आमच्या मनात अरुण गोविल यांनी उमटविली, त्यांच्यासाठी संसद दूर असेल, असे वाटत नाही. आज रामाचे अस्तित्व स्वीकार करणारे असतीलही, पण या अस्तित्वाची जाणीव मतदारच आता करून देतील. रामायण असो वा महाभारत, अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावणारे कलावंत आज संसदेत पोहोचतात. ShriRam-Arun Govil-Meerut त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे लोकही त्यांचा स्वीकार करतात. मात्र, हे स्वीकारताना त्यांनी वठविलेल्या भूमिकांचा पगडा नक्कीच लोकमनावर असतो, हे तेवढेच खरे! संसदेत पोहोचलेल्या प्रत्येक खासदारांकडून लोकांना काहीतरी चांगले करण्याची अपेक्षा असते. आता श्रीरामांची भूमिका करणारेच जर संसदेत जाणार असतील तर त्यांच्याकडून नक्कीच रामराज्याची अपेक्षा केलीच जाऊ शकते. ShriRam-Arun Govil-Meerut जेथे राम असेल, रामाप्रती प्रगाढ श्रद्धा ठेवणारे आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व असेल, तेथे नक्कीच रामराज्याची अपेक्षा वावगी नाही.
 
 
सध्याच्या राजकारणात ‘राम' नाही, असे अनेकदा उपहासाने म्हणतात; मात्र येऊ घातलेल्या लोकसभेत ‘रामा'ची संसदेत हजेरी लागून इतरांनाही प्रेरणा मिळेल, यात शंका नाही. ShriRam-Arun Govil-Meerut जो ठसा रामायणातील रामाने लोकांच्या मनावर उमटविला आहे, त्याला साजेशी कृती संसदेत जाऊ पाहात असलेल्या रामाने केली की रामभक्त नक्की समाधानी होतील. हनुमान, सीता, रावण यांच्या नंतर रामाचा संसदेतील प्रवेश राम मंदिर निर्मितीच्या पृष्ठभूमीवर ऐतिहासिक आणि उत्साहवर्धक करणारा ठरेल. ShriRam-Arun Govil-Meerut शेवटी संसदेसारख्या पवित्र सभागृहात देशच नव्हे तर जगाला आदर्शवत असे व्यक्तिमत्त्व जाणार म्हणजे, चर्चा रामराज्याची होणारच ना?
९७६३६१३४१७