अवघ्या २ तासांत सर केले ‘कळसूबाई शिखर'

बहीण-भावाचा पर्वतारोहणाचा आगळा वेगळा छंद

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
Sister-brother mountain climbing : दिग्रस येथील कृष्णा व वैष्णवी या पद्मावार बहीण भावाला पर्वतारोहणाचा आगळावेगळा छंद आहे. हा छंद जोपासताना नवा किर्तीमान स्थापीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशाच प्रयत्नात त्यांनी अवघ्या दोन तासात कळसूबाई शिखर सर केले.
 
 
y2Apr-Shikhar
 
 
कृष्णा व वैष्णवीने पुण्याजवळील घाटवाट असलेले वागजई, सवासिनी घाट, १ हजार ६६ मिटर उंच शिवनेरी किल्ला, ८२० मिटर उंच रायगड किल्ला, ६८६ मीटर उंच कलावंती दुर्ग, १ हजार १७ मिटर उंच सिंहगड, १ हजार ६४६ मिटर उंचीचे कळसूबाई शिखर, १ हजार ५२३ मीटर उंच भैरवगड, १ हजार ५३२ मिटर उंच घनचक्कर पर्वत व कोल्हापूरजवळील ८४५ मिटर उंच पन्हाळा किल्ला सर केला आहे.
 
यातील घाटवाट जवळपास ९ तासात, गडकिल्ले जवळपास ३ तास तर महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले १ हजार ६४६ मिटर उंचीचे कळसूबाई शिखर केवळ २ तासात सर करून जिद्द व चिकाटीने आपल्या छंदातून एक नवे शिखर गाठले आहे. हे शिखर केवळ दोन तासात सर केल्याबद्दल या बहीण भावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
दिग्रस येथील रहिवासी असलेले व पुणे येथे शिक्षण घेत असलेले कृष्णा पद्मावार व वैष्णवी पद्मावार या बहीण-भावांनी तंज्ञाच्या मार्गदर्शनात मागील चार महिन्यांत वेगवेगळे दिवस निश्चित करून घाटवाट, गडकिल्ले व शिखर सर केले आहेत. गडकिल्ले व शिखर ट्रॅqकग करताना या दरम्यान तज्ञांच्या मार्गदर्शनासोबत विशेष सूचना व माहिती देऊन ट्रॅqकगला सुरवात केल्या जाते. या दरम्यान, सोबत प्रथमोपचार साहित्य, पाणी व अल्पाहारची व्यवस्था असते.