लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
- प्रदेश सहमुख्य  प्रवक्ते विश्वास पाठक यांची माहिती

मुंबई, 
लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार 400 पार’ ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपाने प्रत्येक बुथवर 370 मते वाढविण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सहमुख्य  प्रवक्ते Vishwas Pathak विश्वास पाठक यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत पाठक बोलत होते. यासाठीचे बूथ विजय अभियान बुधवारपासून सुरू होणार असून, ते 6 दिवस चालणार आहे, असे पाठक यांनी सांगितले.
 
 
Vishwas Pathak
 
विधानसभा पातळीवर पक्षाच्या बूथ स्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच 50 प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहेत. मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे, असेही पाठक यांनी नमूद केले. घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर, वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला अशा सर्व समाजातील विविध घटकांसाठी 5 समूह बैठकाही घेण्यात येतील, अशी माहिती Vishwas Pathak पाठक यांनी दिली.