नवी दिल्ली,
Vistara Airlines गेल्या आठवड्यात टाटा समूहाच्या विस्ताराच्या अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. अनेक उड्डान्याना विलंब झाला आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. आता नागरी उड्डाण मंत्रालयाने (MOCA) विस्ताराकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
या अहवालात मंत्रालयाने विमान उड्डाणे विलंब आणि रद्द होण्याची कारणे विचारली आहेत. Vistara Airlines मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, गेल्या आठवड्यात 100 हून अधिक विस्तारा उड्डाणे रद्द किंवा उशीर झाली आहेत.