युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

02 Apr 2024 18:53:34
मंगरूळनाथ, 
abetment of suicide येथील एका २६ वर्षीय युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ३१ मार्च रोजी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मुस्तकीम खान हमीद खान रा. मन्यार चौक मंगरूळनाथ, यांनी पोलिसात तक्रार दिली की ३० मार्च रोजी आरोपी हातात लोखंडी पाईप घेऊन घराच्या आजूबाजूला फिरून मारण्याच्या धमका देत होते, फारुख खान यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
 

suicide 
 
धमयामुळे फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ सलीम हा खूप घाबरून गेला होता. ३० मार्च रोजी झालेल्या या घटनेमुळे सलीम हा सकाळी उठल्यापासूनच तणावात होता. ३१ मार्च रोजी सकाळी घरातील सर्वजण खालच्या मजल्यावर काम करत होते. फिर्यादीने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता सलीम खान हमीद खान (वय २६) याने घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगल ला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ३० मार्च रोजी आरोपी सोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून दहशतीत येऊन सलीम खान यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्यादीत नमूद केले आहे.abetment of suicide दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी विविध कलमानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पो. नि. सुधाकर आडे यांचे मार्गदर्शनाथ सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण डोंगरे व पोलिस कर्मचारी करित आहेत.
 
Powered By Sangraha 9.0