स्वच्छ-शुद्ध हवा-पाण्याचे संकट...!

clean-water-IQ air १४० कोटी लोकांचा जीव संकटात

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
अग्रलेख
clean-water-IQ air भारत जगातली पाचवी मोठी अर्थसत्ता बनली आहे. काही वर्षांत देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. पण, त्याचवेळी भारत जगातला तिसरा प्रदूषित देश म्हणून पुढे आला, ही चिंता  वाढवणारी बाब होय. clean-water-IQ air स्वित्झर्लंडमधील ‘आयक्युएअर' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा एक अहवाल नुुकताच समोर आला आहे. १३४ देशांमधील वातावरणाचा अभ्यास केल्यानंतर जो निष्कर्ष या संस्थेने काढला आहे, तो पाचव्या आर्थिक महासत्तेसाठी घातक मानला पाहिजे. एकीकडे भौतिक प्रगतीने वेग घेतला असताना दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढणे आपल्यासाठी घातक आहे. clean-water-IQ air हवा प्रदूषणाच्या बाबतीत १३४ देशांमध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर, बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब चिंता वाढवणारीच आहे. एक विकसित देश म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. तसेच, देशाला प्रदूषणमुक्त ठेवणे हे सगळ्यात मोठे आणि कठीण आव्हान आहे. clean-water-IQ air या आव्हानाला तोंड देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तयार असल्या तरी त्याची अंमलबजावणी करण्यात अनंत अडचणी येत आहेत आणि त्यासाठी सरकारसोबतच देशातील नागरिकही जबाबदार आहेत.
 

clean-water-IQ air 
 
वायू प्रदूषणामुळे देशातील १४० कोटी लोकांचा जीव संकटात सापडला असताना या समस्येकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. प्रदूषण का वाढते आहे, त्याची कारणं आमच्या लक्षात येऊनही जर आम्ही आवश्यक उपाय अंमलात आणणार नसू तर ईश्वरही आम्हाला वाचवणार नाही. clean-water-IQ air देश विकसित झालाच पाहिजे, स्वित्झर्लंडसारखा स्वच्छ, सुंदर, हिरवागार आणि प्रदूषणमुक्त भारत झाला पाहिजे, याकडे आम्ही लक्ष द्यायला नको? वायू प्रदूषणाचे मूळ कारण असलेल्या धुळीवर नियंत्रण कसे मिळविता येईल, यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक होऊन बसले आहे. सर्व काही सरकारवर सोडून चालायचे नाही. उत्तम आरोग्यासह आपल्यालाही आनंदी जीवन जगायचे असेल तर प्रयत्न आपल्यालाच करावे लागतील. झाडे लावणे, ती जगवणे आणि वाढवणे, हे प्रत्येक नागरिकाचे परमकर्तव्य आहे. आपण फक्त अधिकारांप्रती जागरूक असतो. कर्तव्याप्रती असलेली उदासीनता घालवून सक्रिय झालो तरच आपले कल्याण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. clean-water-IQ air पाणी बाटलीबंद करून विकले जाईल, याची कल्पनाही कधी कुणी केली नव्हती. पण, आज ते वास्तव आहे. बाटलीबंद पाण्याचा धंदा सुरू झाला आहे. या धंद्यात अनेकांनी हात धुवून घेतले आहेत. धंदा करणाऱ्यांकडून वारेमाप कमाई केली जात आहे.
 
 
 
पाण्याची एका लिटरची बाटली २० रुपयांना विकली जात आहे. विवाहादी समारंभांमध्ये आता सर्रास बाटलीबंद पाणी ठेवले जाते. सरकारकडून स्वस्तात पाणी घेऊन ते शुद्ध करून चढ्या दरात विकले जात आहे आणि सामान्यातला सामान्य माणूसही विकत घेऊन हे पाणी पीत आहे. clean-water-IQ air  हे झाले पाण्याचे. दुसरीकडे हवासुद्धा पिशवीबंद वा डबाबंद करून विकण्याचा धंदा सुरू झाला आहे. सर्वात प्रथम कॅनडाने शुद्ध हवा पिशवीत बंद करण्याचा प्रयोग यशस्वी केला. ही पिशवीबंद हवा चीनमध्ये विकली. आजही चीनमध्ये पिशवीबंद हवेला मोठी मागणी आहे. एका पिशवीतली हवा ६० सेकंदांत संपते आणि या ६० सेकंद पुुरणाऱ्या हवेसाठी मोजावे लागतात तब्बल ८०० रुपये! clean-water-IQ air शुद्ध हवा विकली जाते यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण, हळूहळू यावर सगळ्यांचाच विश्वास बसला. आता हे एक कटू वास्तव संकट म्हणून मानवजातीवर घिरट्या घालत आहे. यावर कशी मात करायची, यादृष्टीने उपाय सुरू झाले असले, तरी लवकर उपाय शोधला जाणे आणि त्याची अंमलबजावणी होणे कठीण वाटते आहे. भारतात मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण वाढले आहे. त्यातून भारतातही हिमालयातील हवा डबाबंद करून ती विकण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
 
 
clean-water-IQ air दिल्लीसारखी जी मोठी शहरे आहेत, त्याठिकाणी शुद्ध हवा मिळावी म्हणून घराघरांमध्ये ‘एअर प्युरिफायर' लागले आहेत. नागपुुरातही अनेक घरी आणि कार्यालयांमध्ये एअर प्युरिफायर लागल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. ही वेळ का आली? मनमानी पद्धतीने करण्यात आलेली जंगलतोड, भौतिक विकासाच्या नावाखाली घातला जात असलेला हैदोस, विलासी वृत्तीच्या मनुष्याचा निसर्गाशी चाललेला क्रूर खेळ, वाढलेला अहंकार, निसर्गावर मात करण्यासाठी लागलेली स्पर्धा यामुळे पर्यावरण संतुलन पार बिघडले आहे. पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात जल-वायू प्रदूषण वाढले आहे. clean-water-IQ air त्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधींनी मनुष्य ग्रस्त होताना दिसत आहे. भारतात श्वसनासंबंधीचे रोग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि त्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे. कर्करोगाचे वाढलेले प्रमाण भीषण आहे. दम्याचा आजार झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. हवा प्रदूषणाचे परिणाम हे मानवाच्या शरीरावर होतात. यामध्ये दमा, कॅन्सर, घसा दुखणे, सर्दी अशा अनेक प्रकारांचे आजार मानवाला होतात. clean-water-IQ air हवा प्रदूषणाचे परिणाम हे वनस्पतींवर सुद्धा होतात. त्यामुळे झाडांची पाने वाळणे, फळे कमी प्रमाणात लागणे, झाडाची वाढ कमी होणे अशा अनेक प्रकारांचे परिणाम आपल्याला झाडावर पाहायला मिळतात.
 
 
त्याचप्रमाणे बियांमधून रोपांचे उत्पन्न कमी प्रमाणात होणे. हवा प्रदूषणामुळे हवेचे तापमान वाढते. याचा थेट परिणाम पृथ्वीच्या ओझोन लेयरवर होतो. ओझोन लेयरची पातळी कमी झाल्यामुळे सूर्याची घातक किरणे माणसाच्या शरीरापर्यंत पोहोचून माणसाला त्वचेचे अनेक रोग होतात. जागतिक तापमानवाढ हा वायू प्रदूषणाचा मुख्य परिणाम आहे. ग्लोबल वार्मिंग हा प्रदूषणामुळे असणारा चिंतेचा विषय आहे. ग्लोबल वार्मिंग हे हरितगृहामुळे होते. clean-water-IQ air जागतिक तापमान वाढल्यामुळे वादळांची निर्मिती होते. तसेच अंटार्क्टिकामधील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती तयार होते. जेव्हा पृथ्वीवरील तापमानामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त होते, त्यावेळी पृथ्वीवरील वातावरण चक्र बिघडते. या होणाऱ्या बदलामुळे नैसर्गिकरीत्या हवामानावर या सर्व गोष्टींचा वाईट परिणाम होतो. गाड्या तसेच कारखान्यांमधील बाहेर पडणाऱ्या सल्फर डाय ऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड वातावरणातील हवेसोबत मिळतात. हे वायू वातावरणामध्ये मिसळल्यामुळे पावसाच्या वेळी आम्ल पर्जन्याच्या स्वरूपात पृथ्वीवर पडतात. clean-water-IQ air त्यामुळे अनेक ठिकाणी पीक येत नाही, पाणी आणि माती दूषित होते. वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे याचा परिणाम थेट झाडांच्या वाढीवर दिसून येतो. आम्लपर्जन्य झाल्यामुळे हे पाणी झाडांवर पडते आणि यामुळे झाडांची पाने गळण्यास सुरुवात होते.
 
 
 
झाडांच्या नवीन येणाऱ्या रोपांवरसुद्धा याचा परिणाम होतो. जमीन नापीक झाल्यामुळे या ठिकाणी झाडे व्यवस्थित वाढू शकत नाहीत. अंटार्क्टिका मधील भागात बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी वाढते. या वाढलेल्या पातळीमुळे अनेक प्राण्यांच्या जाती व प्रजाती यांना धोका निर्माण होतो. प्रदूषणामुळे आम्ल पर्जन्य होते. clean-water-IQ air हे पाणी नद्या-नाल्यांमध्ये मिसळल्यामुळे तेथील जल जीवन विस्कळीत होते. वायू प्रदूषणामुळे माणसाला होणारे फुफ्फुसाचे आजार गंभीर आहेत. शरीरामध्ये श्वसनाच्या संबंधित जेवढे काही आजार आहेत त्याचे मूळ कारण हे सध्याचे वाढते प्रदूषण आहे. मानव श्वास घेताना श्वासासोबत आजूबाजूच्या हवेसोबत दूषित हवासुद्धा आपल्या नाकाद्वारे शरीरात घेतो. या हवेमुळे माणसाला श्वसनाच्या संबंधित अनेक आजार होतात. यामध्ये फुफ्फुसांचा आजार, श्वास घेण्यासाठी होणारा त्रास, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होणे अशा प्रकारांच्या अनेक आजारांचा समावेश आहे. clean-water-IQ air अशी सगळी परिस्थिती असताना आणि दरवर्षी यामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होत असताना मनुष्य सुधरायला तयार नाही. दिवसेंदिवस भौतिक गरजा वाढवतानाच मनुष्य दिसतो आहे. एकप्रकारे स्वत:च्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे.