‘माणुसकीची भिंतीने केले मानवतावादी कार्य

मनोरुग्न महिलेची केली नंददीपमध्ये रवानगी

    दिनांक :02-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
humanitarian work :एका मनोरूग्ण महिलेमुळे काकडदाती परिसरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाची माहिती मिळताच माणूसकीची qभत या सामाजिक संस्थेने या महिलेला यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशनच्या मनोरुग्ण सेवा केंद्रात दाखल करुन मनोरुग्णसेवेचे कार्य पार पाडले.
 
 
y2Apr-Manusaki
 
 
 
काकडदातीतील गोqवदनगर चिंतामणी चौक येथे मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या एका मनोरुग्ण बेघर अनाथ महिलेचा नागरिकांना त्रास होत होता. परंतु यावर उपाय सुचत नसल्याने स्थानिकांनी ही माहिती माणुसकीची भिंतीच्या सदस्यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पुसद शहर पोलिस ठाण्याच्याा सहकार्याने महिलेला यवतमाळच्या नंददीप फाउंडेशनद्वारे चालवण्यात येणाèया मनोरुग्ण निवारा केंद्रात स्थलांतरित केले.
 
 
यासाठी रोहन पारध, इमरान वरूड, विशाल महानोर, ऋषभ डोळस, शब्बीर, राहुल धोतरकर, फिरोज, आसद, मंटू भाटिया तसेच पोलिस ठाणे पुसद येथील दिनकर दमकुंडावार, अमित मैदनकर, रजनी बानाईत, वंदना जाधव यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी ‘माणुसकीच्या भिंतीचे परशुराम नरवाडे, अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष संतोष गावंडे, सचिव सोहम नरवाडे, साहेबराव केवटे व ऋषीकेश जोगदंडे यांचे मार्गदर्शन लाभले.