चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67. 57 टक्के मतदान

    दिनांक :20-Apr-2024
Total Views |
उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांनी वाढले मतदान
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
polling in Chandrapur चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 67. 57 टक्के मतदान झाले. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67. 57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42, 43 अंशावर असतांना सुद्धा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजूरा विधानसभा मतदार संघात 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.36 टक्के, वरोरा 67.73 टक्के, वणी 73.24 टक्के तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले.
 
 
matadan
 
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 37 हजार 906 मतदार आहेत. यात 9 लाख 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लाख 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. polling in Chandrapur यापैकी 6 लाख 58 हजार 400 पुरुष मतदारांनी (69.62 टक्के), 5 लाख 83 हजार 541 स्त्री मतदारांनी (65.41 टक्के) तर 11 इतर नागरिकांनी (22.92 टक्के) असे 12 लाख 41 हजार 952 (67.57 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.