मानोरा,
Pohradevi जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील जागृत देवी जगदंबा देवस्थानातील दानपेटीला शासनाकडून सील लावण्यात येण्याच्या मागणीसाठी संस्थानचे विश्वस्त गोपाल महाराज यांनी महिनाभर सुरू ठेवलेल्या साखळी उपोषणाची दखल घेण्यात येऊन सिल लावण्यात आलेल्या दानपेट्यांमध्ये श्रीराम नवमी यात्रोत्सवात भक्तांकडून करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या दानाची मोजणी प्रशासनाकडून सुरू असून, नऊपैकी तीन पेट्यांमध्ये लक्षावधी रुपयाची रोकड प्रशासनाकडून मोजण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

श्रीदेवी सेवालाल महाराज देवस्थानचे विश्वस्त गोपाल महाराज आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश महाराज हे फेब्रुवारी महिन्याच्या दोन तारखेला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू होईपर्यंत तब्बल एक महिना पोहरादेवी येथील जगदंबा देवी मंदिर परिसरामध्ये प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी साखळी उपोषणाला बसले होते. उपोषणकर्ते महाराजांचे संस्थान व्यवस्थापनातील मोजया विश्वस्तांकडून श्रद्धाळूद्वारा देण्यात येणार्या रोख व दाग दागिन्या बाबत अनियमितता होत असल्याचा आक्षेप असल्याने दानपेटीला सील लावण्याची मागणी लावून धरलेली होती. Pohradevi वर्षानुवर्षे जगदंबा देवी संस्थानातील दानपेट्यांमध्ये जमा होणार्या दानाबाबत कुठलाही हिशोब ठेवला जात नसल्याने यावेळी श्रीराम नवमी यात्रोत्सवात प्रशासनाकडून काळजी घेण्यात येऊन मंदिरातील दानपेट्यांना सील लावण्यात आले होते. देवी जगदंबा मंदिरामध्ये प्रशासनाकडून सील लावण्यात आलेल्या ९ दानपेट्यांपैकी ३ दानपेट्यांतील जमा सहा लाख रुपयाची रोख धर्मदाय सहआयुक्त, जिल्हा कोषागार कार्यालय, ग्रामसेवक कार्यालयातील कर्मचार्याद्वारा मोजण्यात आल्याची माहिती असून, सहा दानपेटीतील रोख व जड जवाहिरीची मोजदाद शिल्लक असल्याची माहिती स्थानिक विश्वस्ताकडून देण्यात आले आहे. प्रशासनाकडून दानपेटीत जमा झालेल्या देणगीचे मोजमाप सुरू असताना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी भेट दिली.