गोरक्षण

    दिनांक :20-Apr-2024
Total Views |
विशेष
- डॉ. मयंक चतुर्वेदी
Gorakshan  : राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील भाजपाप्रणीत सरकारचे दोन महत्त्वाचे निर्णय एकाच वेळी पाहायला मिळाले. मध्य प्रदेशात गायींवर अंत्यसंस्कार करणे बंधनकारक करण्यात आले तर राजस्थानमध्ये भाजपा सत्तेत आल्याचा परिणाम असा झाला की ज्या दोन छोट्या गावांमध्ये दररोज 600 हून अधिक गायी मारल्या जात होत्या तेथे आता गोहत्या बंद करण्यात आली आहे. केवळ बंदच नाही, तर गुन्हेगार आपले घर सोडून पळून गेले आहेत. वस्तुत: अलवरमधील खैरथल तिजारा जिल्ह्यातील किशनगढबास भागात असलेल्या बीफ मंडीत (गोमांस बाजारात) खुलेआम गोहत्येचे पुरावे अनेक दिवसांपासून होते, येथे दररोज शेकडो गायी मारल्या जात होत्या. परंतु तुष्टीकरणवादी काँग्रेस सरकारच्या काळात पोलिसांचे हात बांधलेले होते. वस्तुस्थिती ही आहे की राजस्थानमध्ये राजस्थान बोविन अ‍ॅनिमल अ‍ॅक्ट 1995 अंतर्गत गोहत्या आणि गोमांस बाळगल्यास 3 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंडाची तरतूद आहे. या संदर्भात सन 2017 मध्ये राज्यस्तरावर एक महत्त्वाची दुरुस्तीही आणण्यात आली. तसेच, राष्ट्रीय स्तरावर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 अंतर्गत अशा काही तरतुदी देखील करण्यात आल्या आहेत, ज्या अंतर्गत पशूंचा छळ/अत्याचार करणे किंवा त्यांची हत्या करणे या अपराधासाठी 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. पण हिंदूंच्या आस्था-श्रद्धेशी निगडित प्राण्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली जात होती.
 
 
Gomata-1
 
Gorakshan  : गुन्हेगार किती बिनधास्तपणे आणि उघडउघड आपले काम करीत होते याचा पुरावा म्हणजे आजूबाजूच्या परिसरातून आणि इतर राज्यांतूनही मोठ्या संख्येने लोक राजस्थानच्या या जिल्ह्यात गोमांस खरेदीसाठी येत असत. हरयाणातील मेवात परिसरातील सुमारे 50 गावांमध्ये खैरथल तिजारा येथून ‘होम डिलिव्हरी’ची सुविधाही दिली जात होती. या परिसरात बीफ बिर्याणीची खुलेआम विक्री होत होती. अनेक लोक तर मांस आणि कातडी विकून महिन्याला 4 लाख रुपयांहून अधिक कमवत होते. इतिहासात अनेक वेळा आपल्या वडीलधार्‍यांनी, थोरपुरुषांनी काळाच्या संदर्भात जे काही सांगितले त्याचा आपण आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावतो. जे लोक गोहत्येचे समर्थन करतात त्यांना 1958 सालचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि महात्मा गांधी (सोयीनुसार) आठवतात. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या न्यायासनाने असा निर्णय दिला होता की सर्व वयोगटातील गायी (वासरे वगळता), ज्या दूध देण्यास अथवा वजन वाहून नेण्यास सक्षम नाहीत, त्यांची कत्तल करता येईल. न्यायालयाने अशा गायीगुरांना निरुपयोगी म्हणून वर्गीकृत केले होते. पण चार दशकांनंतर, 2005 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने गोवंश निरुपयोगी की उपयुक्त याची पर्वा न करता पशु हत्येवर संपूर्ण बंदी आणण्यास सार्वत्रिक मान्यता दिली.
 
 
या निकालातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी इतर गोष्टींबरोबरच आम्हाला याचीही आठवण करून दिली की भारत ही भगवान महावीर, महाकारुणिक गौतम बुद्ध, गुरू नानक, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि इतर थोर पुरुषांची भूमी आहे आणि दुर्बलांना अधिक सुरक्षेची आणि करुणेची गरज आहे. म्हणून आपण गायीची हत्या करू नये आणि तिचा जीवनात जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे.
 
 
महात्मा गांधींनी वेळोवेळी Gorakshan गोरक्षणाचा पुरस्कार केला आहे. गांधीजी म्हणतात, ती (गाय) आपल्या डोळ्यांच्या भाषेत आम्हाला जणू असे सांगते आहे की ईश्वराने तुम्हाला आमचा स्वामी यासाठी नाही केले आहे की तुम्ही आमची हत्या करावी, आमचे मांस खावे किंवा आमच्याशी गैरवर्तन करावे. तर यासाठी केले आहे की तुम्ही आमचे मित्र आणि संरक्षक बनून रहावे. (संदर्भ : यंग इंडिया, 26.06.1924) गोहत्येचा कलंक केवळ भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून नष्ट झाला पाहिजे, असे गांधीजींचे स्पष्ट मत होते आणि हे काम भारतातूनच सुरू व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी लिहिले आहे - माझी इच्छा आहे की गोरक्षणाचे तत्त्व संपूर्ण जगभर मान्य व्हावे. पण त्यासाठी आधी भारतातील गोवंशाची दुर्दशा संपून तिला योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे - (संदर्भ : यंग इंडिया, 29-1-1925).
 
 
अशा प्रकारे महात्मा गांधी अनेक प्रसंगी थेट गोरक्षणाचा पुरस्कार करताना दिसतात. भारताच्या सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी ते Gorakshan  गोरक्षण-गोसंवर्धन-गोसेवेला अतिशय महत्त्व देत असत. गाईची संतती अर्थात गोवंश भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक व्यवस्थेशी थेट जोडलेली आहे, हे निश्चित.

(पांचजन्यवरून साभार)