पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मतदान करा...

Hindu-Muslim-Election 2024 सीमा न मानणारा विचार

    दिनांक :20-Apr-2024
Total Views |
यंगिस्तान 
 
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
 
 
Hindu-Muslim-Election 2024 हिंदू ही शीघ्र संतुष्ट होणारी जमात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हिंदूंची हिंदू म्हणून कोणतीच मागणी कधीच नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम समाजाच्या मुस्लिम म्हणून अनेक मागण्या होत्या. तुम्ही खिलाफत चळवळीला साथ द्याल तर आम्ही स्वातंत्र्याच्या लढाईत तुम्हाला मदत करू. ही मागणीच त्यांना देशापेक्षा भिन्न ठरवत होती. जेव्हा पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याची वेळ आली तेव्हा पाकिस्तानची मागणी करण्यात आली. Hindu-Muslim-Election 2024 ‘रझाकार चले गए, वफादार रह गए,' असं म्हणणारे ओवैसी स्वतःची मुस्लिम असण्याची तीव्र ओळख नेहमीच दाखवतात आणि त्यांचा पक्ष हासुद्धा मुस्लिम समाजाला वाहिलेला पक्ष आहे; तो भारतीय जनतेचा पक्ष झाला नाही. ट्रिपल तलाक कायदा, सीएए, एनआरसी आदींचा या समाजाने विरोध केला. Hindu-Muslim-Election 2024 त्यांचं म्हणणं आहे की, हे सगळे कायदे मुस्लिम विरोधी आहेत. मला सांगायचं असं आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळातही मुस्लिमांच्या मुस्लिम म्हणून अनेक मागण्या होत्या आणि आजही त्यांच्या अनेक मागण्या आहेत. आजही हा समाज मतदान करताना केवळ आपल्या धर्माचा विचार करतो. पण हिंदूंना स्वतःसाठी काहीच मागावसं वाटत नाही.
 
 

Hindu-Muslim-Election 2024 
 
 
Hindu-Muslim-Election 2024 प्रिय वाचक हो, आपल्याला मतदान का करायचे आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. हिंदूंच्या हिंदू म्हणून मागण्या असणं म्हणजे आपण कट्टरतेकडे वळणं, हा गैरसमज कृपया करून घेऊ नका. २०१४ पूर्वी स्वतःची हिंदू अशी ओळख सांगायला संकोच करणारे लोक आज अभिमानाने आपण हिंदू असल्याचे सांगतात. हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून हा राजकीय बदल २०१४ नंतर झाला. बालकरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना हिंदूंच्या घराघरांत गोडाचा स्वयंपाक बनवला गेला. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर विरोधकांनी टीका का केली? कारण हिंदू एकवटतोय् हे त्यांना बघवत नाही. छत्रपतींनी सर्व हिंदूंना एकत्र केलं आणि स्वराज्य निर्माण करून दाखवलं. Hindu-Muslim-Election 2024 या मुघलांशी आपण लढू शकतो आणि त्यांना या देशातून मारत मारत हाकलून लावू शकतो, हा विश्वास हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंना दिला. हा इतिहास काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना माहीत आहे. म्हणूनच त्यांचा राम मंदिराला विरोध होता. राम मंदिर हे केवळ धार्मिक मंदिर नसून ते राष्ट्र मंदिर आहे. वाळवंटातून आलेल्या वाळवंटी हृदयाच्या अतिरेक्यांनी राम मंदिर उद्ध्वस्त केले. आपण ते मंदिर पुन्हा उभारून दाखवून दिलं की, तुमची संस्कृती उद्ध्वस्त करण्याची आहे आणि आमची संस्कृती निर्माण करण्याची आहे.
 
 
 
 
लक्षात घ्या, जगामधल्या अनेक प्राचीन संस्कृती धार्मिक अतिरेक्यांनी नष्ट केल्या. पण हिंदू संस्कृतीइतके अत्याचार-अन्याय सहन करूनही ठामपणे उभी आहे. Hindu-Muslim-Election 2024 हे संकेत आहेत निसर्गाचे की जगाला हिंदूंची गरज आहे. जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर हिंदूंशिवाय पर्याय नाही. म्हणूनच की काय, आज जगाला हिंदू संस्कृतीकडे येण्याचे वेध लागले आहेत. १९ एप्रिल २०२४ पासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण या निवडणुकांकडे पाहतो. आपण राम मंदिर लोकशाही पद्धतीने मिळवलं, कोर्टात केस जिंकून मिळवलं. म्हणून एका अर्थाने ते लोकशाहीचे मंदिर आहे. समाजमाध्यमावर फोटो फिरतोय्, ‘जो राम को लाए हैं, हमे उन्हे लाना हैं.' याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. आपल्या समर्थ रामदासांनी ‘आत्माराम' असा शब्द वापरला होता. Hindu-Muslim-Election 2024 आपल्या मनातील राम म्हणजे आत्माराम ज्यांनी जागा केला आहे, त्यांना आपल्याला आणायचं आहे. असा याचा अर्थ आहे. आपल्या समोर जे विरोधक आहेत, ते केवळ विरोधक नसून ते शत्रूंसारखे वागत आहेत. वीर हुतात्मा तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडलं नसतं, तर तो हिंदूंनी केलेला हल्ला घोषित झाला असता, ही यांची मानसिकता आहे.
 
 
 
आता राजनाथसिंह यांनी केरळच्या कासारगोड येथील रॅलीमध्ये काँग्रेसला जो प्रश्न विचारला आहे, तो अतिशय गंभीर आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या संकल्प पत्रात असे लिहिले आहे की, जर त्यांची सत्ता आली तर ते देशाची अण्वस्त्रे नष्ट करून टाकतील. म्हणूनच सिंह यांनी काँग्रेसला प्रश्न विचारला की, ‘सीपीआयएमच्या या संकल्पाबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे?' एका झटक्यात गरिबी हटवण्याची भाषा करणारे महान जादूगार राहुल गांधी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाहीत. ते राजकारणात का आहेत, या प्रश्नाचं उत्तर जरी त्यांना ठाऊक असलं, तरी देव पावला म्हणावं लागेल. Hindu-Muslim-Election 2024 सांगायचं तात्पर्य असं की, अण्वस्त्रे नष्ट करणे म्हणजे देशद्रोह करणे होय. सावरकर म्हणाले होते की, आपल्या सीमा मजबूत राहिल्या पाहिजेत. आपण कोणावर हल्ला करायचा नाही. पण आपल्यावर कुणीच हल्ला करणार नाही, ही अंधश्रद्धा आपण मनातून काढून टाकली पाहिजे. स्वातंत्र्य मिळविल्यापासून पाकिस्तान आपल्यावर सतत कुरघोडी करतोय्. आज आपण शस्त्रसंपन्न देश आहोत म्हणून चीन उघडउघड हल्ला करण्याची छाती दाखवत नाही. जर ही अण्वस्त्रे काढून टाकली तर आपल्या देशाचं नाव नकाशावरून गायब होईल आणि हेच कम्युनिस्ट पार्टीला हवं आहे.
 
 
 
Hindu-Muslim-Election 2024 कोणत्याही राष्ट्राच्या सीमा न मानणारा विचार भारतासाठी व जगासाठी घातक आहे. लक्षात घ्या, हा देशद्रोही विचार ते उघडपणे मांडतात. मग त्यांच्या मनात किती पराकोटीचा देशद्रोह भरला असेल?  विशेष म्हणजे हा कम्युनिस्ट पक्ष इंडिया आघाडीचा घटक आहे. इंडिया आघाडीतल्या प्रत्येक पक्षाने या देशद्रोहासाठी अनुमोदन दिलेले आहे, असा याचा अर्थ आम्ही घ्यायचा का? या इंडिया आघाडीविषयी भारतीयांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आहे. यांनी समर्थन दिलेली आंदोलने घातक होती. Hindu-Muslim-Election 2024 दिल्लीमधील सो कॉल्ड शेतकरी आंदोलन, शाहीनबाग, तुकडे तुकडे गँग, परदेशी लोकांद्वारे समोर आलेलं टूलकीट, सीएए, एनआरसीसाठी झालेल्या दंगली... यांचे मनसुबे मुघली आहेत. त्यामुळे आपण अखंड सावधान असलं पाहिजे. भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते परिपूर्ण नव्हतं. पाकिस्तान वेगळा झालाच; त्याचबरोबर अनेक गंभीर जीवघेण्या समस्यादेखील आपल्याला सतावत होत्या. काश्मीरची समस्या काँग्रेस सरकारने ७० वर्षे धगधगत ठेवली.
 
 
 
त्यांच्या या घाणेरड्या राजकारणापोटी हिंदूंचा नरसंहार झाला. तरी हिंदू यांच्या बाजूने उभे राहणार असतील तर यास ‘स्टॉकहोम सिंड्रोम' म्हणावे लागेल. या सर्व समस्यांचं निराकरण आता हळूहळू होत आहे. ही निवडणूक अण्वस्त्रे काढून भारताला कमकुवत करून नष्ट करणारे आणि भारतीयांच्या मनातील आत्माराम जागवणारे यांच्यात होत आहे. Hindu-Muslim-Election 2024 लक्षात घ्या, आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा वैचारिक भ्रष्टाचार खूपच घातक असतो. काँग्रेस संस्कृतीने सदैव वैचारिक भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे निवडणुकीला बाहेर पडताना पूर्ण स्वातंत्र्यासाठी मतदान करायचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.