‘अशा' नेत्यांना आता मतदारांनीच धडा शिकवावा !

Navneet Rana-Sanjay Raut राऊत यांच्या ओंजळीने पाणी पितात

    दिनांक :20-Apr-2024
Total Views |
अग्रलेख
Navneet Rana-Sanjay Raut शिक्षणाने मनुष्य सुशिक्षित होऊ शकतो, पण सुसंस्कृत नाही. शिक्षणाने माणसाला लिहायची, वाचायची आणि बोलायची समज येते, पण काय बोलावे आणि काय बोलू नये, हे समजत नाही. Navneet Rana-Sanjay Raut देवाने दिलेल्या तोंडाचा सकारात्मक वापर करण्याऐवजी माणूस नकारात्मक वापरच जास्त करायला लागला आहे. कुठे काय बोलायचे, यापेक्षा काय बोलू नये, हे ज्याला समजते, तो प्रगल्भ आणि समजूतदार समजला जातो. Navneet Rana-Sanjay Raut पण गेल्या काही दिवसात आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी पायरी सोडली आहे. यात कोणत्याच पक्षाचा अपवाद नाही. सर्वच पक्षांच्या नेत्यांचा यात समावेश आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल वाट्टेल तशी टीका करतात, तर विरोधी पक्षांचे नेते याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असतात. Navneet Rana-Sanjay Raut यात कोणीच कोणाला हार जात नाही. अपशब्द वापरण्याची, शिव्याशाप देण्याची जणू चढाओढच लागलेली असते. ‘उचलली जीभ लावली टाळूला...' असा हा प्रकार असतो. अर्थात सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते असे नाही. याला काही सन्माननीय अपवादही आहेत. Navneet Rana-Sanjay Raut
 
 

Navneet Rana-Sanjay Raut 
 
 
Navneet Rana-Sanjay Raut मात्र, त्यांची संख्या अतिशय थोडी आहे. बहुमत हे वाचाळ नेत्यांचेच आहे. विशेषत: विधानसभा वा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तर अशा नेत्यांना जणू मुक्त रानच मिळत असते. अपशब्द वापरण्याचा, शिवीगाळ करण्याचा परवानाच मिळत असतो. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे शिवसेनेचे अतिवाचाळ नेते संजय राऊत यांनी अमरावतीत येऊन उधळलेली मुक्ताफळं. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याबद्दल राऊत यांनी ज्या भाषेचा वापर केला, ते पाहता त्यांना आपल्या घरात आईबहीण आहे की नाही, याची शंका येते. Navneet Rana-Sanjay Raut निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार हा तुमचा शत्रू नसतो, तर तुमच्या विचारांशी भिन्नता असलेल्या पक्षाचा उमेदवार असतो, याचे भान त्यांना राहिले नाही. त्यात एखाद्या महिलेबाबत बोलताना जास्त सावध राहिले पाहिजे. पण, एका महिलेबद्दल त्यातही लोकसभेची सदस्य असलेल्या महिलेबद्दल आपण कशी भाषा वापरतो, याचे तारतम्य राऊत यांना ठेवता आले नाही. राऊत शिवसेनेच्या ‘सामना' मुखपत्राचे संपादक आहेत. पण गेल्या काही वर्षांतील त्यांची वागणूूक संपादक पदाची गरिमा घालवणारी आहे.
 
 
 
राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत संपादकही असल्यामुळे त्यांच्याकडून अधिक जबाबदारीच्या वागणुकीची अपेक्षा आहे. मात्र, राऊत यांनी गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून अपेक्षाभंगाचा सपाटा लावला आहे. राऊत एका दैनिकाच्या जबाबदार आणि प्रबुद्ध संपादकासारखे नाही, तर भाटासारखे वागू लागले आहेत. Navneet Rana-Sanjay Raut जुन्या काळात राजेलोकांनी आपल्या दरबारात काही भाट ठेवले होते तसेच संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे भाट असल्यासारखे वागत आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सर्वाधिक नुकसान कोणी केले असेल तर ते संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि अन्य नेते बाहेर पडले. यामागील एक प्रमुख कारण हे संजय राऊतही आहेत. राऊत तसेही शिवसेनेतील शरद पवार यांचे हस्तक म्हणून ओळखले जातात. शरद पवार सांगतात, त्याप्रमाणे राऊत वागत असतात. शिवसेनेला कधीही भरून न निघणाऱ्या जखमा करत असतात. पण उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडत नाही, याचे आश्चर्य वाटते. उद्धव ठाकरे यांची स्वत:ची राजकीय समज अतिशय कमी आहे, त्यामुळे ते सतत संजय राऊत यांच्या ओंजळीने पाणी पीत असतात.
 
 
 
 
Navneet Rana-Sanjay Raut पण राऊत यांच्या ओंजळीतील पाणीही त्यांचे स्वत:चे नाही तर शरद पवारांच्या ओंजळीतील असते. आपल्या देशात काही नेते वाचाळ आणि वाह्यात म्हणून ओळखले जातात. यात काँग्रेसचे मणिशंकर अय्यर, दिग्विजयqसह अशा नेत्यांचा समावेश आहे. संजय राऊत तर अशा वाचाळ नेत्यांचे नेते म्हणून शोभून दिसतात. नवनीत राणा यांच्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांचा विशेष राग समजण्यासारखा आहे. कारण नवनीत राणा आणि त्यांचे आमदार असलेले पती रवी राणा यांनी कोरोना काळात मुंबईत जाऊन शिवसेना कार्यालयासमोर हनुमान चालीसा म्हटली होती. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा म्हटल्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे ‘हिज मास्टर्स व्हॉईस' असलेल्या संजय राऊत यांनी चवताळण्याचे कारण नव्हते. Navneet Rana-Sanjay Raut पण ‘रामायण' या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिकेत जेव्हा कोणी भगवान रामाचा उल्लेख ‘श्री' लावून करतात, तेव्हा रावण भडकतो, रामासमोर ‘श्री' लावू नको, असे तो सांगतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची स्थिती जवळपास अशीच झाली आहे. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा म्हटल्यामुळे उद्धव ठाकरे भडकले आणि रावणासारखी कृती करून बसले. आपले मालक संतापल्यामुळे संजय राऊत यांनीही संतापणे स्वाभाविक होते.
 
 
 
 
लोकसभा निवडणुकीत राणा बाईंना पराभूत करून बदला घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आमच्या उमेदवाराला मतदान करा, त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन करण्याचा संजय राऊत यांना निश्चितच अधिकार आहे, पण बदल्याच्या भावनेने समोरच्या उमेदवाराला पराभूत करा, असे आवाहन करून राऊत यांनी आपली नसलेली लायकी दाखवून दिली. Navneet Rana-Sanjay Raut संजय राऊत जवळपास वर्षभर तुरुंगात होेते. त्यांची जागा ही बाहेर नाही तर तुरुंगातच आहे, यात शंका नाही. पण अजूनही त्यांना शहाणपण येत नाही, याचे आश्चर्य वाटते. शिवसेनेला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा निर्धार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या फुटीमुळे सध्या शिवसेना तशीही अर्धी संपली आहे. उरलेली अर्धी शिवसेना म्हणजे शिल्लकसेना संपवण्याची जबाबदारी राऊत यांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारही आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी त्यांनी धरण्यातील पाण्याबाबत केलेले विधान गाजले होते. आता नुकतेच त्यांनी जे आपल्याला मतदान करतील, त्यांना मुक्तहस्ते निधी देण्याचे आवाहन केले आहे. याचाच दुसरा अर्थ जे मतदान करणार नाही, त्यांच्या मतदारसंघाला निधी मिळणार नाही.Navneet Rana-Sanjay Raut
 
 
 
मुलींचा जन्मदर कमी होत असल्यामुळे द्रौपदीची परंपरा पुन्हा आणावी लागते की काय, अशी आशंकाही पवार यांनी व्यक्त केली. त्यांचे हे विधानही महिलांसाठी अपमानास्पद तसेच लज्जास्पद आहे. विरोधी पक्षांच्या विशेषत: काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अशाच आक्षेपार्ह भाषेचा वापर याआधी अनेक वेळा केला आहे. सोनिया गांधींनी त्यांना ‘मौत का सौदागर' म्हटले होते, तर त्यांचे तेवढेच विद्वान सुपुत्र राहुल गांधी यांनी मोदी यांचा उल्लेख ‘चौकीदार चोर है' असा केला होता. Navneet Rana-Sanjay Raut काँग्रेसचे अन्य नेतेही यात आघाडीवर आहेत. राजद नेत्या मिसा भारती यांनी आमचे सरकार आल्यावर पंतप्रधान मोदी यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. आपलं वय किती आणि आपण बोलतो किती, याचे भान नव्या पिढीतील नेत्यांना दिसत नाही. राजकीय नेत्यांचे एक बरे असते, कोणत्याही वादग्रस्त विधानांनी अडचणीत आले की, माध्यमांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे म्हणायला ते मोकळे असतात. फारच अंगलट आले तर सशर्त दिलगिरी व्यक्त करून ते मोकळे होतात. राजकारणात मतभिन्नता असली पाहिजे, मनभिन्नता नको.
 
 
 
Navneet Rana-Sanjay Raut पण आपल्या देशात आज मतभिन्नतेसोबत मनभिन्नताही रुजली आहे. त्यामुळे कधीकाळी सोज्वळ असणारे राजकारण आज हिंसक आणि रक्तरंजित झाले आहे. आपल्या देशातील जनतेने अशी बेलगाम विधाने करणाèया नेत्यांना धडा शिकवला पाहिजे. नेता मग तो सत्ताधारी पक्षाचा असो की विरोधी पक्षांचा; चुकीची, अवमानजनक आणि बदनामीकारक विधाने करणाèया नेत्याला जनतेने त्यांची जागा दाखवली पाहिजे. राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचारावर तसेच अन्य असंसदीय आचरणावर बेंबीच्या देठापासून ओरडणारी सामान्य जनता अशा नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ आली की कच का खाते, ते समजत नाही. Navneet Rana-Sanjay Raut विशेष म्हणजे काही प्रमाणात राजकीय पक्षांनी याची सुरुवात केली आहे. मागील लोकसभेत पातळीशून्य विधाने करणाऱ्या वाचाळ नेत्यांना उमेदवारीच दिली नाही. विशेष म्हणजे यात सर्व पक्षांचा समावेश आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून एक चांगली संधी मतदारांसमोर आहे. त्यामुळे मतदारांनी या संधीचा वापर करत अशी बेलगाम विधाने करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवला पाहिजे. असे नेते वा त्यांचे समर्थक नेते लोकसभेत येणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.