कर्जाच्या पुढच्या टप्प्यासाठी पाकिस्तानची आयएमएफसमोर झोळी

    दिनांक :20-Apr-2024
Total Views |
वॉशिंग्टन/इस्लामाबाद, 
सहा ते आठ अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या पुढच्या टप्प्यासाठी Pakistan पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर झोळी पसरली आहे. या टप्प्यासाठी औपचारिक विनंती करण्यात आली असून, ज्यात हवामान वित्तपुरवठाद्वारे वाढ केली जाणार असल्याचे माध्यमांमध्ये शनिवारी आलेल्या वृत्तांत म्हटले आहे.
 
 
pak
 
रोखीच्या अडचणीत असलेल्या Pakistan पाकिस्तानाने विस्तारित निधी सुविधेच्या अंतर्गत तीन वर्षांसाठी बेलआऊट पॅकेजचे तपशील निश्चित करण्यासाठी पुढील महिन्यात नाणेनिधीच्या पुनरावलोकन मिशन पाठवण्याची विनंती केली. नवीन पॅकेजचा आकार आणि कालमर्यादा मे 2024 मध्ये पुढील कार्यक‘माच्या प्रमुख रूपरेषांवर एकमत झाल्यानंतर निर्धारित केला जाईल, असे वृत्त जिओ न्यूजने वॉशिंग्टन येथून दिले आहे.
 
 
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांच्या नेतृत्वात पाकिस्तानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या वॉशिंग्टनला गेले आहे. Pakistan पाकिस्तानचे अधिकारी अर्थव्यवस्थेचे गुलाही चित्र निर्माण करीत असले, तरी रोखीची चणचण असलेल्या या देशाच्या परकीय चलन साठ्यात घसरण होत आहे. युरोबॉण्ड्सचे चुकारे आणि सध्या देण्यात आलेल्या कर्जाच्या हप्त्यांमुळे साठा घसरला असल्याचे नाणेनिधीने एका अहवालात म्हटले आहे.