पैशासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

तीन जणावर गुन्हा दाखल

    दिनांक :20-Apr-2024
Total Views |
कारंजा लाड, 
Physical and mental harassment माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावून ३३ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी १९ एप्रिल रोजी सासरच्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Physical and mental harassment
 
कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शगुप्ता परवीन इरफान मकवानी ह.मु. काझी प्लॉट कारंजा यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार २४ जून २०११ पासून १७ डिसेंबर २०२३ दरम्यान दत्त मार्केट चित्री बित्री बिल्डींग नेर जि. यवतमाळ येथे आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीचा शारीरीक व मानसिक छळ करुन तिला मारहाण व शिवीगाळ केली व जिवाने मारण्याची धमकी दिली. तसेच माहेरवरुन पाच लाख रुपये आणण्याचा वारंवार तगादा लावत होता. Physical and mental harassment अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इरफान इब्राहीम मकवानी (वय ३६), फरीदा इब्राहीम मकवानी (वय ६०) व शबाना सोहेल सोरटीया (वय ३५) सर्व रा.दत्त मार्केट चित्री बित्री बिल्डींग नेर यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ , ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी सहकलम ४ हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.