नागपूर
Apoorva Balpande अपूर्व अमृत बालपांडे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण. यांनी भवन्स विद्या मंदिर, श्रीकृष्ण नगर येथून शालेय शिक्षण पूर्ण केलेले आहे. रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल येथून बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यांनी २०१८ मध्ये यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वानाडोंगरी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. केले आहे. त्यांनी दिल्ली व पुणे येथून नागरी सेवा परीक्षेची तयारी केलेली आहे. पाचव्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. अपूर्व बालपांडे यांचे वडील अमृत बालपांडे हे जलसंपदा विभागातून सहायक मुख्य अभियंता पदावर सेवानिवृत्त झालेले आहेत. आई विजयश्री ही गृहिणी आहेत. सगळीकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सौजन्य: देवराव प्रधान,संपर्क मित्र