अर्जेंटिनात सापडला 9 कोटी वर्षे जुना डायनासोर

    दिनांक :21-Apr-2024
Total Views |
ब्युनस आयर्स, 
Argentina-Dinosaur : अर्जेंटिनामध्ये एका विशालकाय डायनासोरचे जीवाश्म आढळून आले. हा डायनासोर 9 कोटी वर्षांआधी येथे वास्तव्यास होता, ज्याची मान ते शेपटीपर्यंतची लांबी 98 फूट इतकी होती. या डायनासोरचे नाव भगवान महादेवाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. संशोधकांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस पश्चिमी अर्जेंटिनामध्ये या डायनासोरचा शोध लावला. त्याचे नाव शिव असे ठेवण्यात आले आहे. त्याचा व्हिडीओ आणि फोटो तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून, यासाठी वैज्ञानिक आर्टिस्टची मदत घेत आहेत.  हनुमान जयंतीला शेंदुराचे उपाय बनविणार बिघडलेले काम
 
 
dianasaur
 
Argentina-Dinosaur : 18 डिसेंबर 2023 रोजी एक्टा पेलियोन्टोलोगिका पोलोनिका पत्रिकेत यासंदर्भातील अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार शिव हा आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या सर्वांत मोठ्या सॉरोपोड्सपैकी एक आहे. त्याचे वजन साधारण 74 टन होते. असे असले तरी हा सर्वांत मोठा डायनासोर नव्हता. 55 टनांपेक्षा अधिक वजनाचे मेगाटिटानोसॉर टायटानोसॉर वेगवेगळे विकसित झाले, असे या शोधातून स्पष्ट झाले, अशी माहिती जीवाश्म विज्ञान अभ्यासाच्या प्रमुख लेखिका मारिया एथिज सायमन यांनी दिली. T20 विश्वचषकासाठी जैस्वाल की गिल?
 
शेतकर्‍याला सापडले होते हाड
मॅन्युअल बस्टिंगोरी नावाच्या एका शेतकर्‍याला 2000 साली न्यूक्वेन प्रांतातील त्याच्या शेतात पहिल्यांदाच त्याचे विशाल जिवाश्म सापडले. माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा तुटलेले हाड पाहणे रोमांचकारी होते. ही केवळ सुरुवात होती, असे सायमनने सांगितले. Argentina-Dinosaur संशोधकांना नव्या प्रजातीच्या चार डायनासोरचे अवशेष मिळाले. ज्यात एक संपूर्ण हाडांचा सांगाडा आणि तीन अन्य अर्धवट नमुने होते.  उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 23 हजार नोकऱ्या रद्द