तभा वृत्तसेवा
वर्धा,
Ramdas Tadas : खा. रामदास तडस यांनी 10 वर्षांमध्ये वर्धा लोकसभेचा विकास केला तसेच गरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहीले. आपल्या मतदार संघातील रुग्ण सावंगीच्या रुग्णालयात भरती झाल्यास त्याला मदत करण्यासाठी त्यांचा आपल्याला किंवा अभ्युदय यांना फोन येतो. त्यांना गरिबांची जान आहे. त्यांचा सुख, दुःखात नेहमीच सहभाग असतो. त्यांना आपण सर्वांना मदत करावयाची आहे. देशाच्या विकसीत भारत संकल्पणा साकार करण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्यासाठी रामदास तडस यांना मदत करावी असे आवाहन सागर मेघे यांनी केले.
स्थानिक हेरीटेज येथे सागर मेघे मित्र परिवाराच्या वतीने 20 रोजी आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, सचिन अग्निहोत्री, डॉ. विनय देशपांडे, डॉ. अभ्युदय मेघे, प्रदीप बजाज, मोहन अग्रवाल, डॉ. ललित वाघमारे, अरुण काशीकर, सुनील बुरांडे, अॅड. हर्षवर्धन देशमुख, महेश गुल्हाने, राजेंद्र भुतडा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मेघे पुढे म्हणाले की, वर्धा जिल्ह्यात लवकरच वित्तीय सेवा सुरू करीत आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना एक नवीन सेवा उपलब्ध होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 10 वर्षामध्ये मोठे काम झाले. विदेशात सुद्धा आपल्या देशाचा मान मिळत आहे. पुर्वी अमेरीका व इंग्लंडमध्ये भारतीयांना वेगळ्या नजरेने बघायचे. परंतु, आज भारतीयांचा विदेशात सन्मान होतो. त्यामुळे पंतप्रधान म्हणून आपल्याला तिसर्यांदा नरेंद्र मोदी हवे आहेत आणि संसदेत आपल्या लोकसभेचे नेतृत्व करण्यासाठी तडस हवे असल्याचे ते म्हणाले. यावेळी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी विविध सुचना, प्रश्नांवर चर्चा करण्यात आलीृ प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केले. संचालन व आभार डॉ. अभ्युदय मेघे यांनी मानले. कार्यक्रमाला उद्योजक, व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.