सलमानसाठी अर्पिता पोहोचली निजामुद्दीन दर्ग्यात

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
मुंबई, 
Arpita khan 14 एप्रिलच्या पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोन शूटर्सनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केला. गोळीबारानंतर काही दिवसांनी शूटर्सना अटक करण्यात आली होती. सलमान खानला धमक्या मिळणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. या अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात, पण त्याच्या घरावर गोळीबार होण्याची ही पहिलीच वेळ होती. या गोळीबारामुळे खान कुटुंबीयांपासून त्यांच्या प्रियजनांपर्यंत सर्वांनाच काळजी वाटू लागली होती.

Arpita khan reached Dargah for Salman 
 
आता अर्पिता खान भाऊ सलमान खान आणि कुटुंबासाठी प्रार्थना करण्यासाठी निजामुद्दीन दर्ग्यात गेली. अर्पिताने दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्यात जाऊन नमाज अदा केली. Arpita khan त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर आला आहे. क्लिपमध्ये फुलांच्या ड्रेसमध्ये दिसणारी अर्पिता दर्ग्यात कुटुंबासाठी प्रार्थना करताना दिसत आहे. सलमान खानकडे अनेक आगामी चित्रपट आहेत. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी, त्याने त्याचा आगामी चित्रपट सिकंदरची घोषणा केली. त्याचा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान खानकडे टायगर व्हर्सेस पठाण, किक २, द बुल असे अनेक चित्रपट आहेत.