मतदानानंतर आता जयपराजयाचे समीकरण

Bhandara-Gondia-2024 सामाजिक माध्यमावर सर्वेची चर्चा

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
 
 
Bhandara-Gondia-2024 भंडारा-गोंदिया मतदार संघासाठी मतदान आटोपून तीन दिवस लोटले. जयपराजयाची गणिते आणि विविध सर्वे समाज माध्यमांवर सामायिक झाले असून सर्वेच्या चर्चांचा धूर निघणे सुरू आहे. Bhandara-Gondia-2024 विविधांगी चर्चामुळे नागरिकांचे मनोरंजन होत असताना महायुतीचे घटक पक्ष व काँग्रेसमध्ये मात्र चलबिचल सुरू आहे. आपलाच उमेदवार जिंकणार असा आत्मविश्‍वास असला तरीही, मनात चिंतेची हुरहूर लागली आहे. Bhandara-Gondia-2024 निकालासाठी दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोवर होणार्‍या चर्चेतून आपला निष्कर्ष काढून समाधान मानण्यातच धन्यता मानली जात आहे. एकंदरीत काय तर मेंढे की पडोळे असे दोनच पर्याय जनतेपुढे आहे.Bhandara-Gondia-2024
 
 
 
Bhandara-Gondia-2024
 
 
भंडारा-गोंदिया लोकसभेची यंदाची निवडणूक अनेकार्थाने रंगतदार झाली. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्वच हरवले. Bhandara-Gondia-2024 विद्यमान खासदार सुनील मेंढे रिंगणात असतानाही भाजपाला चांगलाच घाम फुटला. पक्षाची मतदानानंतर होत असलेली चिंता आगामी काळातील संकटाची चाहूल देणारी आहे. काँग्रेस पुन्हा गतवैभवाकडे परतते की काय, असे वाटत चालले आहे. त्यामुळेच भाजपाच्या गोटात चिंता पसरली आहे. मेंढे जिंकतील असा छातीठोक दावा करणारे आता आकडे कमी कमी करत जात आहे. Bhandara-Gondia-2024 दुसरीकडे संघटितपणे झालेल्या प्रचारातून काँग्रेसचा विजय होईल, असा दावा पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत. भाजपाच्या विजयाचे समिकरण मतविभाजनावर अवलंबून असल्याचे बोलले जाते. मेंढे विद्यमान खासदार आहेत. प्रशांत पडोळे थेट जनतेच्या संपर्कात नसलेले उमेदवार आहेत.
 
 
बसपा वंचितनेही नवखे उमेदवार दिले. अर्थातच महायुतीचे सुनील मेंढे व इंडिया आघाडीचे प्रशांत पडोळे यांच्यातच थेट लढत झाली. Bhandara-Gondia-2024 भाजपाकडे मजबूत पक्षसंघटन, प्रचारयंत्रणांचे भक्कम पाठबळ, प्रसिद्धीसाठी हायटेक यंत्रणा, सर्व समावेशक प्रतिनिधित्व, योगी आदित्यनाथ, जेपी नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस या स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या तर काँग्रेसतर्फे केवळ राहुल गांधी व नाना पडोळे वगळता एकही स्टार प्रचारकाची सभा झाली नाही. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मतभेद अन् कुरघोडी, मतविभाजनाची चिंता, मोक्याच्या क्षणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, प्रचारासाठी अपुरे पाठबळ, मतदारापर्यंत थेट पोहोचण्यात अपयश, अपुर्‍या साधनांचा अभाव, प्रचारासाठी मोठ्या नेत्यांची पाठ यामुळे काँग्रेसचा पराभव निश्‍चित समजला जात आहे.Bhandara-Gondia-2024