आदित्य ठाकरे माझा सतत अपमान करायचे

22 Apr 2024 21:30:49
- मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट
 
मुंबई, 
CM Shinde : महाविकास आघाडी सरकारमध्ये मला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. आदित्य ठाकरे माझा सतत अपमान करायचे. त्यांचा माझ्या कामकाजात फार जास्त हस्तक्षेप होता. आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा आहे, अशी भावना उद्धव ठाकरे यांच्या मनात निर्माण झाली होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. एकनाथ शिंदे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले नाही. ते कायमच ढवळाढवळ करीत होते. नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे.
 
 
Chief Minister Shinde
 
नगरविकास खाते काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी ठाकरे माझ्याकडून नगरविकास खाते हिसकावून घेण्याचा विचार करत होते. मला नक्षलवाद्यांकडून धोका होता, अनेक वेळा धमक्या मिळाल्या होत्या. नक्षलवाद्यांचा धोका असूनही मला झेड प्लस सुरक्षा मिळाली नव्हती. आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे उद्धव ठाकरे यांना वाटत होते. मंत्री असूनदेखील वर्षावर बोलावून मला ताटकळत उभे केले जात होते. राज्यसभेच्या निवडणुकीत तर कहरच केला. राज्यसभेचा उमेदवार ठरवताना मला सहभागी करून घेतले नाही. या प्रकि‘येपासून दूर ठेवले, तेव्हा माझा संयम सुटला, असे CM Shinde शिंदे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0