मातृभाषेतून शिक्षणासाठी पुढाकार आवश्यक

English-Medium-Education मातृभाषेला ‘ज्ञानभाषा" म्हणतात

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
वेध
 
 
- नीलेश जोशी
English-Medium-Education शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठीची पालकांची लगबग शैक्षणिक सत्राच्या प्रारंभाआधीच सुरू झाली आहे. त्या-त्या शहरातील नामांकित शाळेतील नर्सरी ते प्राथमिक वर्गात प्रवेश मिळावा म्हणून पालक ‘सर्व' प्रकारची धडपड करीत असल्याचे सध्या दिसून येत आहे. English-Medium-Education चिमुकल्याला कुठल्या शाळेत घालावे यासह कुठल्या भाषा माध्यमाची निवड करावी, यावरही घरोघरी चर्चाप्रसंगी वादविवादही होतात. आईचे एक मत तर वडिलांचे दुसरेच; कधी दोघांचेही विचार जुळलेच तर आप्तस्वकीयांचा सल्ला वेगळाच! English-Medium-Education भाषा माध्यमाची निवड करताना असा गोंधळ उडतो. हा गोंधळ विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा जसजशा वाढल्या तसतसा अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. English-Medium-Education पूर्वी केवळ शहरात राहणाऱ्या पालकांना पडणारा हा प्रश्न आता ग्रामीण भागातही पडायला लागला आहे.
 
 
 
English-Medium-Education
 
 
English-Medium-Education इंग्रजी शाळांचा झगमगाट पाहून शहरी व ग्रामीण भागातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला पालकही प्रसंगी कर्ज काढून, उसनवारी करून लाखो रुपयांची देणगी देत पाल्याचा प्रवेश इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो. खरं म्हणजे इंग्रजी भाषेचे शिक्षण आणि इंग्रजी माध्यमाचे शिक्षण यातच पालकांची गल्लत होते. मातृभाषेतून शिक्षण हीच शिक्षणाची नैसर्गिक पद्धत म्हणावी लागेल. English-Medium-Education कारण जन्माच्या आधीपासून अर्थात मूल आईच्या पोटात असल्यापासून जी भाषा त्या मुलाला ऐकायला मिळते त्या भाषेतून आकलन लवकर होते, असे विज्ञानाद्वारे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. म्हणूनच मातृभाषेला ‘ज्ञानभाषा' असेही म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात माता, मातृभूमी आणि मातृभाषा याला विशेष महत्त्व आहे. English-Medium-Education त्यात मातृभाषेमुळे योग्य संस्कार होऊन त्या संस्काराच्या आधारावर व्यक्तीचे जीवन सुखी आणि समृद्ध होते, असे म्हटले जाते आणि म्हणूनच किमान प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असली पाहिजे, असे भाषातज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ तथा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थानचे म्हणणे आहे.
 
 
 
प्राथमिक, माध्यमिक शिक्षणानंतर इंग्रजी किंवा अन्य परकीय भाषा आत्मसात करणे यात काहीही गैर नाही, पण सर्वांगीण विकास ज्या वयात गतीने होतो त्या वयात मातृभाषेतून शिक्षण घेणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या तोंडून बोबडे बोल ऐकायला सर्वांनाच आवडते. English-Medium-Education जेव्हा मूल अगदीच शिशू अवस्थेत असते, तेव्हा त्याला प्रत्येक घरात चिऊ-काऊच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्या शिशूच्या मन:पटलावर आकाशात उडणारा काऊ किंवा शेणाच्या घरात राहणारा काऊ हा घट्ट झालेला असतो. अशातच त्या चिमुकल्याचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश होतो. तिथे मात्र त्याला चार पायांचा ‘काऊ' शिकविला जातो. या चिमुकल्याच्या मनःपटलावर उडणारा काऊ बिंबलेला असतानाच शाळेत त्याला चार पायाचा काऊ शिकविला जातो आणि येथूनच त्याच्या गोंधळाला सुुरुवात होते. English-Medium-Education कोणता काऊ खरा उडणारा की चार पायांचा या प्रश्नाचे उत्तर मिळविताना त्याची धांदल उडते. केवळ हे एक उदाहरण असले तरी अशा अनेक बाबींमुळे मुलांचा गोंधळ उडतो. इंग्रजी अस्खलित यावं, असे समर्थन इंग्रजी माध्यमाची निवड करणारे अनेक जण करतात. पण इंग्रजी भाषा येण्याकरिता पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेण्याची खरंच गरज आहे का?
 
 
 
इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यावर इंग्रजी येते का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण ही खरी म्हणजे नैसर्गिक बाब मूल जन्माला आल्यानंतर आपसूक जी भाषा शिकते ती मातृभाषा. समाजात, कुटुंबात वावरताना संभाषणातून ती शिकली जाते. स्वाभाविक विचारांची प्रक्रिया मातृभाषेतून होते. English-Medium-Education हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा केवळ मातृभाषा असते. अन्य भाषा शिकल्यानंतर त्याचे प्रथम मेंदूला मातृभाषेत रूपांतरित करावे लागते; नंतर ते ग्रहण केले जाते. ही संभ्रमावस्था ओळखून केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. आठवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर आदिवासी भाषांसह भारतीय अनुसूचित भाषांमधील ५२ लघु पाठ्यपुस्तकांचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. English-Medium-Education यात विशेष म्हणजे १७ आदिवासी भाषांचा समावेश आहे. शासनाने याबाबत पुढाकार घेतला आहेच; पण समाजानेही यासाठी पुढे येऊन मातृभाषेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची आपल्या पाल्यापासून सुरुवात करणे गरजेचे आहे.
९४२२८६२४८४