हनुमंताचे वाक्चातुर्य !

Hanuman Jayanti-Ramayan तो तुझ्या मृत्यूचा पाश...

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
कानोसा
 
 
- अमोल पुसदकर
Hanuman Jayanti-Ramayan पवनसुत हनुमानाला आपण बुद्धी आणि शक्तीची देवता मानतो. समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी हनुमंताची मंदिरे उभी केली. समाजाला हनुमंताच्या उपासनेला व बलोपासनेला लावले. हनुमंताचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर बलशाली गदाधारी हनुमान उभा राहतो. Hanuman Jayanti-Ramayan परंतु, हा हनुमान केवळ शक्तिशाली नाही तर युक्तिशाली आहे. ''बुद्धिमतां वरिष्ठम्'' म्हणजे बुद्धिमान लोकांमध्ये वरिष्ठ असे त्याचे वर्णन आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतामाईच्या शोधासाठी वनांमध्ये भटकत होते, त्यावेळेला सुग्रीवाला ते दिसतात. Hanuman Jayanti-Ramayan सुग्रीव हनुमंताला म्हणतो की, ‘‘हे दोन तपस्वी कुमार कोण आहेत? त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी काय भावना आहे? ही सर्व माहिती तू घेऊन ये.'' त्यावेळेस हनुमंत एका ब्रह्मचारीच्या वेशामध्ये राम आणि लक्ष्मण यांच्यासमोर उभा राहतो व तो त्यांना म्हणतो की, ‘‘किष्किंधा नगरीचे महाराज सुग्रीव हे धर्मपरायण आहेत. Hanuman Jayanti-Ramayan ते या ऋष्यमुक पर्वतावर वास्तव्यास असतात. मी त्यांचा मंत्री हनुमान आहे. आपण दोघे जरी तपस्वी वेशात असले, तरीही आपल्यामुळे या जंगलातील प्राणी भयभीत झालेले आहेत. त्यामुळे कृपा करून आपण दोघे कोण आहात हे सांगावे.''
 
 
 
Hanuman Jayanti-Ramayan
 
 
हनुमंताचे भाषण ऐकल्यावर प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात की, ‘‘याच्या बोलण्याकडे पाहून तर असे वाटते की, यांनी ऋग्वेद-यजुर्वेद अशा वेदांचे अध्ययन केले असावे. याचे बोलणेसुद्धा व्याकरणाला अनुसरून आहे. त्यामुळे हा फार विद्वान वाटतो.'' ही प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांची पहिली भेट होती. Hanuman Jayanti-Ramayan परंतु, या पहिल्याच भेटीमध्ये हनुमंताने आपल्या बोलण्याची छाप प्रभू रामचंद्रांवर पाडलेली आपल्याला दिसून येते. सुग्रीव प्रभू रामचंद्रांना म्हणतो की, ‘‘तुम्ही वालीचा वध करून किष्किंध्येचे राज्य मला मिळवून देण्यामध्ये मदत करा; त्या बदल्यात मी सीतामातेच्या शोधामध्ये माझ्या हजारो वानरांना चारही दिशांना पाठवीन व सीतामातेचा शोध घेईल.'' परंतु, पावसाळा समाप्त झाल्यावरसुद्धा ज्यावेळेस सुग्रीव त्याच्या वानरांना पाठवत नाही, त्यावेळेस प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात की, ‘‘लक्ष्मणा, तू किष्किंधा नगरीत जाऊन बघ आणि सुग्रीवाला त्याच्या वचनाची आठवण करून दे.'' Hanuman Jayanti-Ramayan सुग्रीव त्याचे वचन विसरला आहे, हे बघून लक्ष्मणाला फार राग येतो. क्रोधायमान झालेला लक्ष्मण ज्यावेळेस किष्किंधा नगरीच्या प्रवेशद्वारावर जाऊन उभा राहतो, त्यावेळेस त्याला शांत करण्यासाठी सुग्रीव हनुमंताला म्हणतो की, ‘‘तू लक्ष्मणाला सामोरे जा व त्याला काहीही करून शांत कर.''
 
 
 
हनुमान लक्ष्मणाच्या समोर जात म्हणतो की, ‘‘सुग्रीव हा वानर आहे. वानर हे चंचल असतात. त्यामुळे त्याच्या स्वभावामुळे त्याला त्याने दिलेल्या वचनाचे काही काळाकरिता विस्मरण झाले असेल तरी आपण तो वानर असल्यामुळे त्याला क्षमा करावी व त्याला त्याच्या वचनाची आठवण करून देत पुन्हा त्याच्याकडून आपल्याला जे कार्य करायचे आहे, ते करून घ्यावे.'' या प्रसंगात रागावलेला लक्ष्मण काही अंशी हनुमंताच्या बोलण्यामुळे शांत होतो. Hanuman Jayanti-Ramayan  सीतेचा शोध घेत असताना वानर व हनुमान एका विवरामध्ये शिरतात. तेथे ‘स्वयंप्रभा' नावाची एक वृद्ध तपस्विनी तपस्या करीत असते. त्या विवराची ख्याती अशी असते की, जो प्राणी जिवंतपणे त्या विवरांमध्ये प्रवेश करेल तो जिवंत बाहेर जाऊ शकणार नाही. त्यामुळे ते सर्व एका मोठ्यात संकटामध्ये सापडले असतात. Hanuman Jayanti-Ramayan त्यावेळेस हनुमान त्या वृद्ध तपस्विनीला नमस्कार करून तिला आपण राम कार्यासाठी व सीतेच्या शोधासाठी निघालेलो असून आपल्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, असे सांगतो. हनुमंताच्या भाषणाने संतुष्ट होऊन ती वृद्ध तपस्विनी या सर्वांना सीतेचा शोध कोणीकडे घेतला पाहिजे, याचे मार्गदर्शन करते व जिवंतपणे सर्वांना समुद्राच्या किनाèयावर पोहोचविते.
 
 
 
Hanuman Jayanti-Ramayan ज्यावेळेस हनुमान अशोक वनामध्ये सीतेला भेटायला जातात, त्यावेळेला सीता दुःखी व भयग्रस्त झालेली असते. अशा सीतेसमोर आपण कसे जावे, हा प्रश्न हनुमंताच्या मनामध्ये येतो. कसेही गेले तरीही सीता घाबरू शकते, हे त्याला वाटते. त्यामुळे तो सीतेच्या समोरच्या वृक्षावर बसून अयोध्येपासून ते वनापर्यंत रामाचा प्रवास कसा झाला, हे बोलायला लागतो. त्याचे बोलणे ऐकून सीतेचे लक्ष त्याच्याकडे जाते. तिच्या मनातील भीती थोडी कमी होते. त्यानंतर हनुमंताशी तिचे बोलणे होऊन हनुमंत तिला आपल्या जवळची ‘राम-मुद्रिका' दाखवतो. Hanuman Jayanti-Ramayan यावरून संकटग्रस्त व भयग्रस्त व्यक्तीशी संवाद कसा साधायला पाहिजे, हे हनुमंताने आपल्याला दाखवून दिलेले आहे. हनुमंताला रावणाची भेट घ्यायची असते. त्याच्याशी संवाद साधायचा असतो. त्याच्या इतर सर्व वीरांना बघायचे असते. ही संधी आपल्याला उपलब्ध होण्यासाठी काहीतरी उपद्रव करणे आवश्यक आहे, असे मानून हनुमंत अशोक वाटिकेचा विध्वंस करतो. त्यानंतर त्याच्याशी युद्ध करायला आलेल्या ८० हजार किंकर जातीच्या राक्षसांना तो म्हणतो, ‘‘आता तुम्ही माझे बल बघा, माझा पराक्रम बघा. Hanuman Jayanti-Ramayan माझ्यापेक्षाही पराक्रमी असे शेकडो वानर महाराज सुग्रीव व महाराज राम यांच्या जवळ आहेत. ते सर्व लंकेला येतील व तुमचा सर्वनाश करतील.''
 
 
 
 
हनुमंतांनी अप्रत्यक्षपणे रावणाच्या सैन्यामध्ये निर्माण केलेली ही भीतीच आहे. इंद्रजीतच्या द्वारे ज्यावेळेस हनुमंताला पकडले जाते त्यावेळेस हनुमंत रावणाची भेट होईल, त्याच्या दरबारात जायला मिळेल म्हणून पकडला जातो व रावणाच्या समोर जाऊन उभा राहतो. Hanuman Jayanti-Ramayan तेथे रावणाला तो म्हणतो की, ‘‘तू जानकीला श्रीरामांकडे परत कर. या त्रिभुवनामध्ये श्रीरामांचे अमोघ बाण सहन करण्यासाठी कोणीही सक्षम नाही. जिला तू सीता समजतो आहे तो तुझ्या मृत्यूचा पाश आहे. त्याला तू स्वतःहून आपल्या गळ्यामध्ये घालून घेऊ नको.'' Hanuman Jayanti-Ramayan अशा पद्धतीने तो रावणाच्या व त्याच्या मंत्र्यांच्या मनामध्ये सीतेला वापस केले पाहिजे, अशा पद्धतीचा विचार पेरतो व त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतो. रावण त्याला म्हणतो की, ‘‘थांब! मी तुला आताच मृत्युदंडच देतो.'' त्यावेळेला तो रावणाला म्हणतो की, ‘‘तू एकच रावण नाही तर तुझ्यासारखे कोटी रावणसुद्धा माझे काहीही वाकडे करू शकत नाही.'' Hanuman Jayanti-Ramayan हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमंताच्या शक्ती, युक्ती, पराक्रम या सर्व गुणांचे स्मरण आपण केले पाहिजे व एवढे सर्व गुण असूनही हनुमान ‘रामकाज करीबे को आतुर' अशा पद्धतीचा होता. यावरून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, असे वाटते.