इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभाग प्रमुखाचा राजीनामा

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
तेल अविव, 
इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख Major General Aharon Haliva मेजर जनरल अहरॉन हलिवा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला, त्यानंतर इतर हल्लेही झाले. या हल्ल्याची पूर्वमाहिती मिळविण्यात अपयश आल्याने पद सोडत असल्याचे हलिवा यांनी स्पष्ट केले.
 
 
Haliva
 
इस्रायलवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडणारे अहरॉन हे पहिलेच अधिकारी ठरले आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमांवर स्फोट घडवले, क्षेपणास्त्र डागली, ज्यामध्ये आतापर्यंत 1200 लोक ठार झाले. गाझामध्ये 250 लोकांना ओलिस ठेवण्यात आले. हमासच्या हल्ल्याची माहिती मिळवण्यात लष्कराच्या गुप्तचर विभागाला अपयश आले होते. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने इस्रायलच्या अनेक भागात हल्ले केले. मात्र, याची माहिती गुप्तचर विभागाला नव्हती. अहरॉन यांच्या राजीनाम्यानंतर लष्कराने एक पत्रक काढले. त्यात म्हटले की, Major General Aharon Haliva अहरॉन यांनी हमासच्या हल्ल्याचे खापर स्वत:वर फोडले आहे. आपण गुप्तचर विभागाचे प्रमुख असूनही हल्ल्यांचा डाव हाणून पाडण्यात अपयशी ठरल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामापत्रात केला आहे.