सावध ऐका पुढल्या हाका...

Narendra Modi-Chickballapur सांस्कृतिक राष्ट्रवाद व हिंदुत्व

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
अग्रलेख
Narendra Modi-Chickballapur आपल्याला सत्तेबाहेर करण्याचा विदेशी शक्तींसह, देशांतर्गत संघटना व बड्या लोकांचा कट असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप गंभीर असून देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देणाऱ्या या देशविरोधी शक्तींचे कारस्थान सावध व जागरूक भारतीयांनी हाणून पाडले पाहिजे. Narendra Modi-Chickballapur कर्नाटकच्या चिकबल्लापूर येथे आयोजित जाहीर सभेत शनिवारी पंतप्रधान मोदींनी देशांतर्गत विरोधकांवर हल्लाबोल करतानाच राष्ट्रविरोधी शक्ती विदेशात राहून भारताच्या अंतर्गत कारभारात कशा हस्तक्षेप करीत आहेत व केंद्र सरकार उलथून लावण्यासाठी कशा कार्यरत आहेत, हे देशवासीयांना सांगितले. Narendra Modi-Chickballapur वस्तुस्थिती ही आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाप्रणीत रालोआची सत्तासूत्रे हाती घेतल्यापासूनच म्हणजेच मे २०१४ पासूनच देशविरोधी शक्ती सक्रिय झाल्या होत्या. ‘राष्ट्र प्रथम' हाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा मूलमंत्र आहे. प्रखर देशभक्ती, उत्कट राष्ट्रवाद हा या सरकारचा पाया आहे तर मातृभूमीच्या दिग्विजयाची मनीषा हे या सरकारचे ध्येय आहे. Narendra Modi-Chickballapur त्यामुळे आपल्या तत्त्वांना अनुसरून मोदी सरकारने सर्वप्रथम देशविरोधी शक्तींच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केला. मोदींच्या आधी दहा वर्षे डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेसप्रणीत संपुआ सरकार होते ते एवढे दुबळे आणि कणाहीन होते की, भारताचा आवाजच जगाच्या पाठीवर उमटत नव्हता.
 
 
Narendra Modi-Chickballapur
 
 
 
Narendra Modi-Chickballapur बडे देश तर सोडाच, पण अगदी लहानसहान देशही भारताला फारशी किंमत देत नव्हते. अनेक विदेशी कंपन्यांनी आपला निकृष्ट दर्जाचा माल भारताला याच काळात निर्यात केला. यासाठी या कंपन्यांनी लाचलुचपतीचा मार्ग स्वीकारून, भारतातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथे बस्तान बसविले आणि निकृष्ट दर्जाचा माल भारतीयांच्या माथ्यावर थोपविण्यास सुरुवात केली. मात्र, केंद्रात देशभक्तीने प्रेरित मोदी सरकारने सत्तासूत्रे हाती घेताच आधी या विदेशी कंपन्यांची दुकानदारी बंद करून टाकली. Narendra Modi-Chickballapur या कंपन्यांना भारतात उदार आश्रय देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कायदेशीर मार्गाने शिक्षा होईल, याची व्यवस्था केली. सर्वत्र आपला धाक निर्माण केला. कुणालाही भ्रष्ट मार्गाने, लाचलुचपत देऊन मनमानी करता येणार नाही व भारतात अवैध मार्गाने व्यवसाय करता येणार नाही, असा कठोर संदेश मोदी सरकारने आपल्या कृतीतून दिला. एवढेच नव्हे तर जनसेवेच्या, आरोग्यसेवेच्या नावाखाली भारतातील नागरिकांचे धर्मांतर घडवून आणणाऱ्या व भारतात हिंदुविरोधी कारवाया करणाऱ्या, फुटीरवादी घटकांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक विदेशी स्वयंसेवी संस्थांवर मोदी सरकारने फेमा कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली. Narendra Modi-Chickballapur त्यांची बँक खाती गोठवली. विदेशातून मिळणाऱ्या निधीला चाप लावला. त्यांना काळ्या यादीत टाकले. त्यामुळे साहजिकच या विदेशी शक्तींची, विदेशी कंपन्यांची दुकाने बंद होऊन त्यांना भारतात मनमानी करणे अशक्य होऊन बसले.
 
 
 
आज याच भारतविरोधी विदेशी शक्ती विविध मार्गांनी सक्रिय झाल्या असून नरेंद्र मोदी सरकारला सत्तेबाहेर करण्याचा कट रचत आहेत. दुर्दैवाने भारतातील विरोधी पक्षांची वागणूक आणि त्यांच्या नेत्यांची वक्तव्ये या विदेशी शक्तींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बळ देणारी व भारताला दुर्बल करणारी ठरत आहे. जेव्हा केंद्रात किंवा भारतातील एखाद्या राज्यात काँग्रेसप्रणीत सरकार असते तेथेच या भारतविरोधी शक्ती कशा सक्रिय होतात, हे देशवासीयांनी पाहिले, अनुभवले आहे. Narendra Modi-Chickballapur सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करणाऱ्या, येथील लोकशाहीबाबत गळे काढणाऱ्या व काश्मीरमधील फुटीरवादी घटकांना उघड पाठींबा देणाऱ्या ब्रिटनच्या वेस्टमिनिस्टर विद्यापीठातील भारतीय वंशाच्या एका वामपंथी विचारांच्या प्राध्यापिकेला कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने २४ व २५ फेब्रुवारी रोजी एका परिसंवादानिमित्त आमंत्रित केले होते. संविधान व राष्ट्रीय एकता संमेलनानिमित्त हे आमंत्रण होते. तत्पूर्वी, काही महिने आधी लंडनमधील विद्यापीठातील वामपंथी, पुरोगामी बुद्धिजीवींची, प्राध्यापकांची काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भेट घेतली होती आणि आता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येताच याच सेक्युलर वर्तुळातील प्राध्यापिकेला परिसंवादानिमित्त आमंत्रित करण्यात आले, हा निव्वळ योगायोग नाही तर ठरवून करण्यात आलेला तो राष्ट्रघातकी उद्योग आहे. Narendra Modi-Chickballapur केंद्रातील मोदी सरकारला खिजविण्यासाठीच काँग्रेसी व डावे यांनी हा उद्योग केला होता.
 
 
 
मात्र, सदैव दक्ष, जागृत असलेल्या केंद्र सरकारने या प्राध्यापिकेला ती बंगळुरू विमानतळावर उतरताच आल्या पावली लंडनला परत पाठवून तिला तिची जागा दाखविली आणि देशविरोधी शक्तींना भारतात थारा नाही, असा कठोर संदेश दिला. ही प्राध्यापिका भारतविरोधी असून सदैव पाकिस्तानचे समर्थन करीत असते व ती ‘भारत तोडो ब्रिगेड'चा हिस्सा असल्याचा स्पष्ट आरोप कर्नाटक भाजपाने सबळ पुराव्यांसकट केला. Narendra Modi-Chickballapur भाजपाने या देशविरोधी शक्तींना उघडे पाडताच काँग्रेस प्रवक्त्यांची पळापळ सुरू झाली, त्यांची अक्षरश: दाणादाण उडाली व माध्यमांपुढे तोंड दाखविणे त्यांना अवघड होऊन बसले, ही वस्तुस्थिती आहे. भारताला विरोध करीत काश्मीरमधील फुटीरवाद्यांचे व पाकिस्तानचे उघड समर्थन करणाऱ्या वामपंथी मंडळींना काँग्रेस सरकार शैक्षणिक कार्यक्रमात आमंत्रित करते याचा अर्थ काय? काँग्रेस पक्षात लिबरल, वामपंथी मंडळींनी घुसखोरी केली आहे, हा याचा स्पष्ट पुरावा आहे. Narendra Modi-Chickballapur एकीकडे धर्मनिरपेक्षतेच्या लंब्याचवड्या बाता मारून दुसरीकडे मुस्लिमांचे तुष्टीकरण करणाऱ्या व फुटीरवादी शक्तींना पाठबळ देणाऱ्या काँग्रेसचा ‘हात' नेमका कोणाच्या खांद्यावर आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास केवळ वामपंथीच नव्हे, तर काँग्रेसी, समाजवादी, पुरोगामी, तथाकथित धर्मनिरपेक्ष, अर्बन नक्षलसमर्थक, चित्रपट-नाट्य-साहित्य क्षेत्रातील पुरोगामी मुखंड आणि याच विचारांच्या स्वयंसेवी संस्था या कोणालाच केंद्रातील मोदी सरकार नको आहे. याचे कारण स्पष्ट आहे. ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद व हिंदुत्व' हे मोदी सरकारचे प्राणस्वर आहेत.
 
 
 
Narendra Modi-Chickballapur वर उल्लेख केलेले पक्ष व पुरोगामी संघटना यांचा या तत्त्वांना प्रखर विरोध आहे. ज्या पक्षाला, ज्या हिंदुत्ववादी संघटनांना आयुष्यभर कडाडून विरोध केला तो पक्ष, त्या संघटनांनी हिंदुत्वाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. आपली कथित सेक्युलर, समाजवादी व वामपंथी तत्त्वे बाजूला पडली, सर्वसामान्य लोकांनी आपल्याला लाथाडले आणि संघ परिवाराला जवळ केले, याचा या पुरोगाम्यांना राग आहे. उजव्या विचारसरणीचा भाजपा हा भारतातील प्रमुख सत्ताधारी पक्ष ठरला. Narendra Modi-Chickballapur त्याने १० वर्षांपासून केंद्रात आपली पक्की मांड ठोकली आहे व आपले वर्चस्व आता संपुष्टात आले आहे, हे या काँग्रेसी-कम्युनिस्ट व पुरोगामी संघटनांना कसे सहन होणार? त्यामुळेच हे पक्ष व संघटना बेंबीच्या देठापासून ओरडत मोदी सरकारवर दुगाण्या झाडत आहेत. यांचा मोदी सरकारला एवढा टोकाचा विरोध आहे की, यासाठी भारत विरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळण्यास देखील त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. Narendra Modi-Chickballapur काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक संदेश प्रसारित झाला होता. तो आज सर्वाधिक प्रासंगिक आहे... ‘‘मतदान कुणालाही करा... आवर्जून करा... न चुकता करा... पण एकच काळजी घ्या. सरकार बनल्यावर ‘जल्लोष' आपल्या देशात व्हायला हवा... शत्रू राष्ट्रात नव्हे...! तेवढी एकच काळजी घ्या.'' राष्ट्रविरोधी शक्तींना हाणून पाडण्यासाठी दक्ष राहून कृतिशील होणे, हेच आपले कर्तव्य आहे.