25 हजार 154 नवमतदार बजावणार पहिल्यांदा मतदानाचा हक्क

New Voters-Wardha वर्धा लोकसभा मतदारसंघ

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
वर्धा, 
 
New Voters-Wardha वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी दुसर्‍या टप्प्यात म्हणजेच 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. निवडणूक विभागाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवमतदारांची नोंदणी केली असून वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 18 ते 19 वयोगटातील 25 हजार 154 नवमतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. New Voters-Wardha वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून अमरावती दोन व वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
 

New Voters-Wardha  
 
New Voters-Wardha या सहाही विधानसभा मतदारसंघातील 18 ते 19 वयोगटातील 25 हजार 154 नवमतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. धामणगाव विधानसभा मतदारसंघातील 3 हजार 452, मोर्शी विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 762, आर्वी विधानसभा मतदारसंघातील 5 हजार 279, देवळी विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 56, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 147 आणि वर्धा विधानसभा मतदारसंघातील 5 हजार 458 नवमतदारांचा समावेश आहे.New Voters-Wardha या निवडणुकीत 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या लक्षणीय आहे. लोकशाहीच्या महोत्सवामध्ये नवमतदारांनी सहभागी होऊन येत्या 26 एप्रिलला उत्साहात मतदान करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.