निंबाळकर, पाटील यांनाआयोगाची नोटीस

22 Apr 2024 21:44:07
- आचारसंहिता भंग केल्याचा ठपका
 
धाराशिव, 
Omraje Nimbalkar-Archana Patil : एकमेकांविरोधात केलेल्या आरोपांवरून निवडणूक आयोगाने धाराशिव लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले आहे.
 
 
raje
 
Omraje Nimbalkar-Archana Patil : ओमराजे निंबाळकर यांनी एका सभेत बोलताना तेरणा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारकडून 18 कोटी रुपये घेतले, असा आरोप भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केला होता. तसेच, उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेल्या सभेत पाटील यांनी पैसे देऊन गर्दी जमा केल्याची तक‘ारही निंबाळकर केली होती. यावर आरोप चुकीचा असल्याचे सांगत अर्चना पाटील यांनी ओमराजेंची तक्रार आयोगाकडे केली केली होती. त्यावरून याप्रकरणाचे सबळ पुरावे सादर करण्याचे आदेश देत आयोगाने दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावली आहे. तर, निंबाळकर यांच्या आरोपानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, विरोधक खासदार हा नंबर एकचा खोटारडा आहे. त्यांनी चुकीचे आरोप करू नयेत अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल. त्यांनी पुरावे द्यावेत, दोषी असल्यास राजकारण सोडून देईल. आपण प्रामाणिकपणे रुग्णसेवा करतो. पैशात मोजण्याचा हा विषय नाही.
Powered By Sangraha 9.0