राहुल गांधींच्या फुटीच्या राजकारणापासून सावध राहा

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
- स्मृती इराणी यांचे अमेठीच्या मतदारांना आवाहन
 
अमेठी, 
रामलला प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारणारे काँग्रेस नेते राहुल गांधी 26 एप्रिलनंतर अमेठीत येतील आणि जातिवादाच्या नावाखाली जनतेत फूट पाडतील. मंदिरांना भेटी देण्याचा धडाका सुरू करतील; मात्र हा त्यांचा दिखावा असेल. त्यांच्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन भाजपा उमेदवार व केंद्रीय मंत्री Smriti Irani स्मृती इराणी यांनी सोमवारी निवडणूक प्रचारादरम्यान केले.
 
 
Smriti Irani
 
अमेठी लोकसभा मतदारसंघातील भेटुआ आणि भादर भागात प्रचारासाठी आलेल्या इराणी म्हणाल्या, वायनाडमधील मतदान झाल्यानंतर राहुल अमेठीत येतील. तुम्हाला जातिवादाच्या नावावर विचलित करतील; फूट पाडण्याचा प्रयत्न करेल, मात्र तुम्ही अशा राजकारणापासून सावध राहा. अमेठी माझे कुटुंब सांगणारे राहुल यांनी कधीही येथील जनतेच्या समस्या संसदेत मांडल्या नाहीत. अनेकदा सभागृहात गैरहजर राहिले. राहुल गांधी 15 वर्षे या मतदारसंघाचे खासदार होते. त्यापैकी 10 वर्षे संपुआचे सरकार असताना येथील जनतेची पाण्याची समस्या दूर करू शकले नाही. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर अमेठीत मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली. पक्के रस्त्याचे बांधकाम आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केल्या. काँग्रेसने मात्र मतांच्या राजकारणाशिवाय काहीही केले नाही, असा आरोप Smriti Irani त्यांनी सभेतून केला.
एकेकाळचा बालेकिल्ला काँग्रेसच्या हातातून निसटला
अमेठीतून काँग्रेसने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. स्थानिक नेते राहुल गांधी यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची मागणी करीत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतSmriti Irani  इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला होता. अमेठीचा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, मोदी लाटेत हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटला आहे. भाजपाची मजबूत स्थिती पाहता काँग्रेस या मतदारसंघात उमेदवार जाहीर करू शकली नाही.