महायुतीचे बारणे यांचे अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन

22 Apr 2024 21:47:56
- मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची उपस्थिती
 
पुणे, 
मावळ मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे Srirang Barne श्रीरंग बारणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी काढलेल्या रॅलीतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
 

barne 
 
आकुर्डी खंडोबा माळ चौक ते पीएमआरडी कार्यालय इथंपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना आणि महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार Srirang Barne श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे अशी लढत आहे. बारणे यांच्या रॅलीत 80 वर्षांच्या आजी सहभागी झाल्याने सर्वांचे लक्ष आपसूकच त्यांच्याकडे गेले. अनसूया कदम असे त्यांचे नाव असून, त्या कट्टर शिवसैनिक आहे. त्यांचा उत्साह पाहून मुख्यमंत्री शिंदे प्रचार वाहनातून उतरून आजीकडे गेले आणि त्यांची आस्थेने विचारपूस केली.
Powered By Sangraha 9.0