यादीत नाव तपासा नाही तर रहाल मतदानापासून वंचित !

22 Apr 2024 20:08:23
तभा वृत्तसेवा
 
 
वर्धा, 
 
 
Voter App-Election 2024  उमेदवार, विविध पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या घरापर्यंत येऊन मत मागणार आहेत, मागतही आहेत. परंतु, तुम्ही मतदान करू शकणार आहात काय? तुम्ही ठरवलेल्या उमेदवाराला मत देता येईल काय याची तपासणी तुम्हालाच करायची आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या निर्देशात तुमचे नाव गायब असल्याची शक्यता नाकारता येत नाही. Voter App-Election 2024 मतदानाच्या दिवशी वेळेवर धावपळ होण्यापेक्षा आधीच नाव तपासलेले बरे! विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान कमी झाल्याची सर्वत्र ओरड आहे. त्यानंतर मतदानाचा टक्का आपल्या मतदार संघात वाढावा यासाठी सामाजिक संघटनांनी व्हॉट्अ‍ॅपच्या माध्यमातून आवाहनही करणे सुरू केले. Voter App-Election 2024
 
 
Voter App-Election 2024
 
परंतु, वास्तवात निवडणूक विभागाच्या मतदान यादीत तुमचे नाव आहे का इथपासून प्रश्‍न उपस्थित होत आहे. गेल्या चार दिवसात अनेकांची नावं मतदार यादीत नसल्याचे उघड झाले आहे. Voter App-Election 2024  त्यापैकी काहींनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदान केले असताना यावेळी आपले नाव का नाही असा प्रश्‍न मतदारांनी उपस्थित केला. परंतु, निवडणूक विभागाने दिलेल्या निर्देशात मतदान ओळख पत्रावरील फोटो पुसट असणे, दोन ठिकाणी नाव असणे आदी कारणाने संबंधित विभागाने नाव उडवली आहेत. Voter App-Election 2024  गाव सोडून गेलेले, मृत झालेल्यांचा समावेश मतदार यादीत असल्याने यादीतील मतदारांची संख्या फुगलेली दिसत होती. तो फुगवटा कमी करण्यासाठी निवडणूक विभागाने नावं कमी करण्याची मोहीम राबवली होती.
 
 
 
त्यानंतर आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याचे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी वारंवार केले आहे. परंतु, मतदार राजा असल्याने त्याने आपले नाव यादीत आहे किंवा नाही याचा शोध घेतला नाही. Voter App-Election 2024  परिणामी, आता ऐन मतदानाच्या तोंडावर अनेकांची नावं मतदार यादीत दिसण्याची शक्यता नाही. उन्हात आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री मतदारांनी करावी. अन्यथा उन्हात फिरलो पण यादीत नावच नाही म्हणून हिरमुसले व्हावे लागेल.
 
 
Powered By Sangraha 9.0