महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या सभेला भरघोस प्रतिसाद

Wardha-Ramdas Tadas बकाणे यांनीही कसली कंबर

    दिनांक :22-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
वर्धा, 
 
Wardha-Ramdas Tadas भाजपा व महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ देवळी विधानसभेतील अल्लीपूर व कानगाव येथे झालेल्या जाहीर सभेला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. देवळी विधानसभेचे निवडणूक प्रमुख राजेश बकाणे यांनी सुरुवातीपासुनच मेहनत घेणे सुरू केले आहे. Wardha-Ramdas Tadas ग्रामीण भागात सायंकाळी झालेल्या सभेला झालेली उपस्थिती ही विजयाची नांदी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. या दोन्ही सभांना महायुतीचे उमेदवार रामदास तडस, आ. समीर कुणावार, देवळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजेश बकाने, माजीमंत्री अशोक शिंदे, माजी खासदार सुरेश वाघमारे, किरण उरकांदे, जिल्हा महामंत्री राहुल चोपडा, नाना ढगे, जिपचे माजी सदस्य श्याम शंभरकर आदी उपस्थित होते. यावेळी आ. Wardha-Ramdas Tadas समीर कुणावार म्हणाले की, वर्धा जिल्ह्यात चौफेर विकास झाला त्यात खा. रामदास तडस यांची महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या गावाचा,मतदार संघाचा विकास करायचा असेल हे मत रामदास तडस यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्या, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
Wardha-Ramdas Tadas
 
Wardha-Ramdas Tadas राजेश बकाणे यांनी अल्लीपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या सभेत वैयक्तिकरित्या खासदार रामदास तडस यांना अपमानास्पद बोलल्या गेले. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाची संस्कृती दिसते, असे म्हणून तीव्र शब्दात निषेध केला. विकासाच्या राजकारणात लोकसभेची जनता नक्कीच पाठिंबा देईल व मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील असे वातावरण असल्याचे सांगितले. Wardha-Ramdas Tadas अशोक शिंदे यांनी, श्रीरामाच्या मंदिर निर्माणानंतर देशात उत्साहाचे वातावरण आहे. धर्म व आस्था या देशाचा अविभाज्य अंग असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय धार्मिक अस्मितेला एक नवीन दिशा दिल्याने खा. तडस यांना विजयी केल्यास ते मत पंतप्रधानांना मिळेल, असे सांगितले. घराणेशाही विरोधात माझ्या सारख्या समान्य घरच्या माणसाची ही लढाई आहे, असे खा. तडस म्हणाले. Wardha-Ramdas Tadas नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या कमळ या चिन्हाचे बटन दाबून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन तडस यांनी केले. यावेळी किरण उरकांदे, राहुल चोपडा, अशोक सुपारे यांनी मार्गदर्शन केले.