पाचपोहरला सहा जनावरांचा मृत्यू

22 Apr 2024 18:22:44
तभा वृत्तसेवा
झरीजामनी, 
farmers in vain तालुक्यातील शिबला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाचपोहर शिवारात जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिल पेंदोर व देवराव टेकाम यांचा एक एक बैल, वासुदेव टेकाम यांच्या दोन गाई, केशव टेकाम यांचा एक गोऱ्हा व एक गाय अशी एकुण सहा जनावरे दगावली आहेत.
 

rtrt 
 
farmers in vain  त्यामुळे पाचपोहर येथिल शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही जनावरे नेमकी कशामुळे दगावली याचे कारण कळू शकले नाही. विष बाधा झाल्यामुळे जनावरे दगावली की इतर कोणते कारण आहे हे अद्याप कळू शकले नाही. सामजिक कार्यकर्ते पांडुरंग पोयाम व प्रदीप दुधकोहळे यांनी याची माहिती पशू चिकीत्सकाला दिली असुन पशू चिकित्सकाकडून पंचनामा सूरू असून त्यानंतर जनावरांच्या मृत्युचे कारण कळू शकेल.
 
Powered By Sangraha 9.0