कृषी निर्यात नऊ टक्क्यांनी घसरली

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Agricultural Exports : 2023-24 च्या एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत देशाची निर्यात 8.8 टक्क्यांनी घसरून 43.7 अब्ज डॉलर्सची झाली. लाल समुद्रातील संकट, रशिया-युक्रेन युद्ध आणि तांदूळ, गहू, साखर आणि कांद्यावर घातलेल्या बंदीमुळे निर्यातीत घसरण झाली. या कालावधीत 47.9 अब्ज डॉलर्सची निर्यात झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. भारताच्या कृषी जीडीपीमध्येही घसरण झाली असून, 2023-24 मध्ये केवळ 0.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022-23 मधील 4.7 टक्क्यांवरून ती कमी झाली आहे.
 
 
Agricultural Exports
 
Agricultural Exports : एपीईडीएमधील 719 अनुसूचित कृषी उत्पादनांची निर्यात एप्रिल-फेब्रुवारी 2023-24 मधील 24 अब्ज डॉलर्सच्या तुलननेत मागील आर्थिक वर्षाच्या 11 महिन्यांच्या कालावधीत 6.85 टक्क्यांनी घसरून 22.4 अब्ज डॉलर्स झाली आहे. निर्यात बंदी आणि तांदूळ, गहू, साखर आणि कांदा यासारख्या वस्तूंवरील निर्बंधांमुळे मागील आर्थिक वर्षात सुमारे 5 ते 6 अब्ज डॉलर्सच्या कृषी निर्यातीला फटका बसला आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले.