रामनवमीला हिंसाचार झालेल्या ठिकाणी निवडणूक नको

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
- कलकत्ता उच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
 
कोलकाता, 
Calcutta High Court : बंगालमध्ये रामनवमीला झालेल्या हिंसाचारावरून कलकत्ता न्यायालयाने मंगळवारी अत्यंत कठोर टिप्पणी केली. रामनवमीला हिंसाचार झाला, त्या मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीची परवानगी दिली जाणार नाही, असे न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला इशारा देताना स्पष्ट केले. मुर्शिदाबाद येथे रामनवमीला मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवगणम् प्रमुख असलेल्या खंडपीठाने ही टिप्पणी केली.
 
 
Calcutta High Court
 
Calcutta High Court : नागरिक शांतता आणि सद्भाव ठेवू शकत नसतील, तर निवडणूक आयोग या मतदारसंघांमध्ये निवडणूक घेऊ शकणार नाही, असे आम्ही सांगू आणि ही एकमेव पद्धत आहे. आचार संहिता लागू असताना दोन गट असा हिंसाचार करीत असतील, तर ते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या लायकीचे नाहीत, असा संताप न्यायालयाने व्यक्त केला. या हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत किती लोकांना अटक करण्यात आली, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर, सीआयडीने हे प्रकरण हाती घेतले आहे, असे राज्य सरकारच्या वतीने वकिलाने सांगितले. आता या प्रकरणी शुक‘वारी सुवावणी केली जाईल.