नुडल्सच्या पाकिटात आणले हिरे

23 Apr 2024 20:12:07
- मुंबई विमानतळावर चार जणांना अटक
 
मुंबई, 
Diamond smuggling नुडल्सच्या पाकिटात लपवलेले हिरे आणि प्रवाशाच्या शरीरात तसेच बॅगमध्ये लपवलेले सोने सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर जप्त केले. याचे एकत्रित मूल्य 4.46 कोटी रुपये आहे. 4.44 कोटी रुपयांचे 6.815 किलो सोेने आणि 2.02 कोटी रुपयांचे हिरे आठवड्याच्या अखेरीस जप्त केल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली, असे सीमाशुल्क विभागाने सोमवारी रात्री जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.  मार्कस स्टॉइनिसने IPL इतिहासात केला मोठा विक्रम
 
 
Diamond
 
Diamond smuggling मुंबई येथून बँकॉकला निघालेल्या एका प्रवाशाला अडवून त्याच्या सामानाची तपासणी केली असता, ट्रॉली बॅगमध्ये नुडल्सच्या पाकिटात लपवलेले हिरे आढळले. नंतर या प्रवाशाला अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. कोलंबो येथून मुंबईला आलेल्या एका विदेशी महिला प्रवाशाला रोखले. तिच्याकडे अंतर्वस्त्रात लपवलेले 321 ग्रॅम सोने आढळले. याशिवाय, दुबई आणि अबुधाबी येथून प्रत्येकी दोन आणि बहरीन, दोहा, रियाध, मस्कत, बँकॉक आणि सिंगापूर येथील प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आणि त्यांनी सामानात लपवलेले 4.04 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.
अन्...अहंकाराने भरलेला शहाजहान शेख रडायला लागला video 
Powered By Sangraha 9.0