बंडखोर नेते ईश्वरप्पा भाजपातून सहा वर्षांसाठी निष्कासित

23 Apr 2024 20:58:50
नवी दिल्ली, 
कर्नाटकमधील बंडखोर भाजपा नेते K. S. Eshwarappa के. एस. ईश्वरप्पा यांना आज भाजपातून सहा वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. माजी उपमु‘यमंत्री आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष राहिलेल्या ईश्वरप्पा यांनी आपल्या मुलासाठी कांतेशसाठी हावेरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. भाजपाने या मतदारसंघातून माजी मु‘यमंत्री बसवराज बोम्मई यांना उमेदवारी दिली. आपल्या मुलाला उमेदवारी न मिळाल्याचा ठपका ईश्वरप्पा यांनी प्रदेश भाजपा अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि त्यांचे वडील माजी मु‘यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्यावर ठेवला होता. विजयेंद्र यांचे भाऊ आणि विद्यमान खासदार राघवेंद्र यांना भाजपाने शिमोगा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
 
 
K. S. Eshwarappa
 
हावेरीमधून मुलाला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या ईश्वरप्पा यांनी शिमोगा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या आदेशानंतरही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. प्रदेश भाजपाच्या शिस्तभंग समितीचे अध्यक्ष लिंगराज पाटील यांनी ही कारवाई केली. पक्षाने निष्कासित करण्याचा आदेश दिल्यानंतरही निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावर ईश्वरप्पा ठाम आहेत. मी निवडणूक लढवणार, जिंकणार आणि भाजपात परत येणार, असा दावा ते करीत आहेत.
 
 
K. S. Eshwarappa : ईश्वरप्पा यांची नाराजी येदीयुरप्पा यांच्याविरोधात आहे. येदीयुरप्पा आणि त्यांचा प्रदेश अध्यक्ष असलेला मुलगा विजयेंद्र पक्षात मनमानी करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत 75 वर्षीय ईश्वरप्पा यांनी राजकारण संन्यास घेण्याची आणि विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.
Powered By Sangraha 9.0