जैस्वालच्या शानदार शतकाने राजस्थानने मुंबईचा केला पराभव

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Rajasthan beat Mumbai संदीप शर्माच्या (5/18) अप्रतिम गोलंदाजीनंतर युवा फलंदाज यशस्वी जैस्वालच्या (104*) नाबाद शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने सोमवारी मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव करून प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत केला. राजस्थानचा हा आठ सामन्यांमधला सातवा विजय असून ते प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. मुंबईने राजस्थानसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते 18.3 गडी गमावून पूर्ण केले. या मोसमात राजस्थानचा मुंबईवर दुसरा विजय आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 700 हून अधिक धावा केल्यानंतर मालिकावीर ठरलेली यशस्वी जैस्वाल सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याच रंगात दिसली.
 

rajsta 
 
गेल्या सात डावांत 24, 5,10, 0, 24, 39 आणि 19 धावा करणाऱ्या यशस्वीकडे पाहता, या फलंदाजाने आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सलग दोन द्विशतके झळकावली असतील, असे वाटत नाही. सातत्याने मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरल्यानंतर टी-20 विश्वचषकात यशस्वीच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र या फलंदाजाने दाखवून दिले की, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे निवडकर्त्यांसाठी इतके सोपे नाही. Rajasthan beat Mumbai यशस्वीने 59 चेंडूत नऊ षटकार आणि सात षटकार लगावत शतक झळकावले. यशस्वीने शतक झळकावून आगामी T20 विश्वचषकासाठी आपला दावा पक्का केला आहे. या मोसमात शतक झळकावणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज आहे. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या यशस्वीचे आयपीएलमधील हे दुसरे शतक असून त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन्ही शतके झळकावली आहेत. गेल्या वेळी त्याने वानखेडेवर पहिले शतक झळकावले होते.
राजस्थानच्या विजयात यशस्वीशिवाय संदीप सिंगचाही मोठा वाटा होता. संदीपने केवळ 18 धावांत पाच बळी घेतले. संदीप शर्माच्या चेंडूंना मुंबईच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हते. पॉवरप्लेमध्ये इशान आणि सूर्यकुमारची शिकार करणाऱ्या संदीप शर्माने शेवटच्या षटकातही अप्रतिम गोलंदाजी केली. एकेकाळी मुंबई 190 हून अधिक धावसंख्येकडे वाटचाल करत होती, पण शेवटच्या षटकात आलेल्या संदीपने पहिल्याच चेंडूवर अर्धशतक झळकावणाऱ्या टिळकला बाद करून मुंबईच्या इराद्याला तडा दिला. पुढच्याच चेंडूवर कोएत्झी आणि पाचव्या चेंडूवर टीम डेव्हिडची विकेट घेत त्याने मुंबईला 179 धावांवर रोखले. 2022 मध्ये झालेल्या लिलावात संदीपला कोणीही विकत घेतले नाही. Rajasthan beat Mumbai त्यानंतर राजस्थानने त्याला प्रसिद्ध कृष्णाच्या बदली संघात समाविष्ट केले. दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने खेळू न शकलेल्या संदीपसाठी या मोसमातील हा केवळ तिसरा सामना होता आणि त्याने पाच विकेट घेत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. या मोसमात अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी जसप्रीत बुमराह आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी पाच बळी घेतले होते.