राज्यात 45 जागा महायुती जिंकणार बुलढाण्यात प्रतापराव जाधव नंबर एक वर

प्रतिस्पर्धी एकमेकांविरूद्ध नंबर दोनची लढत लढणार

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
बुलढाणा, 
Uday Samant महायुती महाराष्ट्र राज्यातील 45 जागा जिंकणार असून त्यात बुलढाणा लोकसभा मतदार संघात प्रतापराव जाधव नंबर एकवर असून प्रतिस्पर्धी उबाठा व अपक्ष नंबर दोनची लढत लढणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. बुलढाण्यात प्रचाराचा आढावा घेण्यासाठी आलेले शिवसेना स्टार प्रचारक उदय सामंत यांनी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पक्ष निरीक्षक पारकर, सचिन जाधव, व पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
Uday Samant
 
उदय सामंत यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चारशे पार तर राज्यात 45 जागा निवडूण येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत बजावलेली दमदार कामगिरी, देशाचा चौफेर विकास, जगात देशाची उंचावलेली मान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झालेला विकास यामुळे महायुतीला हे घवघवीत यश मिळणार आहे.बुलढाणा मतदारसंघात ही प्रतापराव जाधव बहुमताने बाजी मारणार असा दावाही त्यांनी बोलून दाखविला. Uday Samant अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या नावाच उल्लेख न करता शेतकर्‍याच्या संदर्भात आंदोलन करायची आणी न्याय मिळाला की तो माझ्या मुळेच मिळाला, अस भासवायचे असा प्रकार बुलढाणा मतदारसंघात सर्रास सुरू आहे. असे सांगून त्यांनी बियाणे कंपन्या कडून दादागिरी ने पैसे उकळायचे काम सुरु असल्याचे असल्याचा आरोप करून प्रतापराव जाधव यांच्या विरोधात निवडणुकीत असा शेतकरी नेता उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर नावाची पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी बुलढाणा मतदारसंघात जाधवांची लढत आघाडी की तुपकर यापैकी कुणा सोबत आहे? असे विचारले असता, त्यांनी जाधव यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. दुसर्‍या क्रमाकासाठी अपक्ष रविकांत तुपकर आणि आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत असल्याचे सांगितले.