संभाजीनगरातून मीच निवडणूक लढणार : विनोद पाटील

23 Apr 2024 20:50:51
- एकनाथ शिंदे भुमरेंना माघार घ्यायला लावणार
 
छ. संभाजीनगर, 
Vinod Patil : लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, असा विश्वास मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा देणार्‍या विनोद पाटील यांनी व्यक्त केला. काल सकाळीच विनोद पाटील यांनी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर विनोद पाटील यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच, असे म्हटले होते. उदय सामंत यांनी समजूत काढूनही Vinod Patil विनोद पाटील यांनी माघार घेण्यास नकार दिला होता.
 
 
Vinod Patil
 
उदय सामंत यांनी माझी भेट घेऊन माघार घेण्याबाबत विनंती केली. पण, मी त्यांना सांगितले की, संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत सर्व्हे करा. सर्व्हेत माझ्या बाजूने निकाल नसेल, तर मी माघार घेईन. निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे. मी बालहट्ट करीत नाही. 25 तारखेला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मी निवडून येऊ शकत नसल्याचे पटवून द्या, मी माघार घेतो, अशी भूमिका विनोद पाटील यांनी घेतली. दोन आमदार आणि एक खासदार माझ्याबद्दल मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चुकीची माहिती देत आहेत. उमेदवार बदलण्यासाठी मु‘यमंत्री शिंदे योग्य निर्णय घेतील, असा विश्वास Vinod Patil विनोद पाटील यांनी व्यक्त केला.
 
 
‘हेलिकॉप्टर’ची मागणी
आम्ही दरवर्षी हेलिकॉप्टरमधून महापुरुषांवर पुष्पवृष्टी करतो. त्यामुळे हेलिकॉप्टर चिन्ह मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही विनोद पाटील यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0