शेअर बाजारांत तिसरे सत्रही तेजीचे

23 Apr 2024 21:20:32
मुंबई : 
stock market : जागतिक बाजारांतील सकारात्मक संकेतांमुळे ग‘ाहकोपयोगी वस्तू, तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील समभागांत दणक्यात झालेल्या खरेदीमुळे शेअर बाजारांत सलग तिसर्‍या दिवशी मंगळवारी तेजी होती. मात्र, जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर, बाहेर पडणारी विदेशी गुंतवणूक आणि निर्माण झालेल्या भूराजकीय तणावाने तेजीला मर्यादा आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
 
 
stock market
 
400 अंकांची उसळी घेतल्यानंतर stock market मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली. अखेर केवळ 80 अंकांच्या वाढीसह 73,738 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात त्याने 411 अंकांची उसळी घेतली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी केवळ 31 अंकांनी वधारून 22,368 या पातळीवर बंद झाला.
Powered By Sangraha 9.0