भाविनी पटेल प्राथमिक शर्यतीत पराभूत

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
वॉशिंग्टन, 
भारतीय अमेरिकन Bhavini Patel भाविनी पटेल पेनसिल्व्हेनियामधून डेमोक्रॅटिक काँग्रेसच्या प्राथमिक शर्यतीत पराभूत झाल्या, परंतु त्यांनी पदावर असलेल्या उमेदवारांना कडवी झुंज दिली. विद्यमान काँग्रेसवुमन समर ली पेनसिल्व्हेनियाच्या 12 व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टसाठी प्राथमिक शर्यतीत विजेते असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यांना 59 टक्के मते मिळाली, तर पटेल यांना 41 टक्के मते मिळाली. अपेक्षेप्रमाणे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी आपापल्या अध्यक्षीय प्राथमिक निवडणुका जिंकल्या. बायडेन यांना डेमोक्रॅटसकडून 94 टक्के मते मिळाली.
 
 
BHAVINI-PATEL-3
 
ट्रम्प यांना 80 टक्के व मार्चमध्ये शर्यतीतून बाहेर पडलेल्या भारतीय अमेरिकन निक्की हेलीला पेनसिल्व्हेनिया अध्यक्षीय प्राथमिकमध्ये रिपब्लिकनकडून आश्चर्यकारकपणे सुमारे 20 टक्के मते मिळाली. Bhavini Patel भाविनी पटेल या बायडेन यांच्या समर्थक आहेत, तर समर ली या राष्ट्राध्यक्षांचे खुले टीकाकार आहेत. त्यांनी इस्रायलविरुद्धच्या युद्धात पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. समर ली सार‘या पुरोगामी उमेदवार अजूनही पिट्सबर्गसारखे जिल्हे जिंकू शकतात, हेच भाविनी पटेल यांच्या पराभवातून दर्शविते. मूळची भारतातील गुजरातची भाविनी पटेल यांची आई स्थलांतरित म्हणून अमेरिकेत आली. येथे आल्यावर तिने मला व माझ्या भावाला एकल पालक म्हणून वाढवले. आम्ही खूप फिरलो. आईने विविध शहरांमध्ये विविध नोकर्‍या केल्या. रेस्टॉरंट उद्योगात भांडी धुणे, मोटेल उद्योगात काम केले, असे पटेल यांनी आधीच्या मुलाखतीत सांगितले.