स्वच्छ व सुंदर बसस्थानक : विभागीय चमूकडून सर्वेक्षण

24 Apr 2024 21:49:02
- आर्णी बसस्थानकाचे झाले सर्वेक्षण

आर्णी, 
Bus Station Survey : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील बसस्थानके स्वच्छ आहेत का, बसस्थानकासोबतच परिसर स्वच्छ आहेत का, जनतेच्या बसस्थानकाबाबत काही तक्रारी आहेत का, त्यातच स्वच्छ पिण्याचे पाणी प्रवाशांना मिळते का, आवश्यक सर्व बाबी बसस्थानकावर उपलब्ध आहेत का, या सर्व निकषांवर ही प्रतियोगिता आहे.
 
 
y24Apr-Survey
 
त्या बाबतीत आर्णी बसस्थानकात नागपूर विभाग नियंत्रक पथकाने सकाळी 10 वाजता संपूर्ण Bus Station Survey बसस्थानक व परिसराची तपासणी करुन त्यानंतर गोपनीय अहवाल नागपूर विभागीय चमूचे प्रमुख विभाग नियंत्रक विनोद चवरे, सां‘यकी अधिकारी परिक्षित उकंडे, सहायक कार्यकारी अभियंता विलास पाध्ये यांनी तयार केला. यावेळी आर्णी बसस्थानकात कर्तव्यावर उपस्थित असलेले बसस्थानक प्रमुख राजेंद्र तळवटकर व आलासिंग राठोड यांच्याशी संवाद साधत निर्धारित वेळेवर धावणार्‍या बसगाड्या, रद्द होणार्‍या बसफेर्‍या, प्रवासी तक‘ार याबाबत सविस्तर चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी दारव्हा आगारप्रमुख नितिन उजवणे, सहायक वाहतूक निरीक्षक सोनाली पवार, देवेंद्र धारवाड, परवानाधारक अजीज शेख, स्वच्छतादूत देवानंद ससाने प्रमु‘याने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0