मतदार जागृतीसाठी पेट्रोलियम संघटनेचा पुढाकार

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
- मुख्याधिकार्‍यांनी केला पत्रक वितरणाचा शुभारंभ

यवतमाळ, 
Commencement of leaflet distribution : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक यंत्रणा व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून मतदार जनजागृती अभियान सुरू आहे. शहरातील वस्तीवाड्यांसह वर्दळीच्या ठिकाणी जागृतीपर कार्यक‘म आयोजित करून मतदानाच्या घटनादत्त अधिकाराचे महत्त्व पटवून देत नागरिकांना मतदानाबाबत आवाहन करण्यात येत आहे.
 
 
y24Apr-Survey
 
Commencement of leaflet distribution : या उपक‘मात सहभागी होत यवतमाळ जिल्हा पेट्रोलियम डीलर्स संघटनेचे अध्यक्ष रमेश भूत व त्यांच्या सहकार्‍यांनी 10 हजार हस्तपत्रक वितरणाचा संकल्प केला असून शहरातील सर्व पेट्रोलपंपांवर त्यांचे वाटप केले जाणार आहे. यवतमाळ नगर परिषद मु‘याधिकारी विजय सरनाईक यांच्या हस्ते पांढरकवडा मार्गावरील धनगंगा पेट्रोलपंप येथे या पत्रक वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक‘मात यवतमाळकर नागरिक व सेवाभावी संस्था संघटनांचे सहकार्य मिळावे म्हणून मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी राबविलेल्या संपर्क अभियानाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला आहे. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक सेवाभावी संस्था व संघटनांनी या अभियानात पुढाकार घेतला आहे.