गांधीबागेत भूमिगत विद्युत केबल टाकावी

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
- नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी
- महावितरणचे मुख्य अभियंता दोडके यांना निवेदन
 
नागपूर,
Electricity Supply  : गांधीबागेतील बाजारपेठ परिसरात वीजेची गंभीर समस्या असल्याने मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलपर्यंतच्या मार्गावर भूमिगत विद्युत केबल टाकण्यात यावी, अशी मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष फारुख अकबानी यांनी महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्याकडे केली आहे.सध्याच्या घडीला नागपूर शहर आणि ग्रामीण भागात विद्युत तारा ट्रिप होण्याचे प्रकार वाढले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने कूलर, एसीमुळे विजेचा वापर वाढला आहे. गांधीबाग, इतवारी, सीताबर्डी आदी भागातील सर्व उद्योग व्यवसायातील दुकान व कार्यालयातील बहुतांश कामे संगणकावर केली जाते.
 


NVCC-1
 
 
वारंवार Electricity Supply वीजेचा पुरवठा खंडीत होत असल्याने व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होण्याचा धोका वाढला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच महावितरणने वीज पुरवठ्याची योग्य देखभाल करावी तसेच वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. भूमिगत केबल टाकण्यासाठी अन्य शासकीय विभागांचीही मंजुरी आवश्यक असून मेयो रुग्णालय ते सुनील हॉटेलपर्यंत भूमिगत केबल टाकण्यासाठी अन्य विभागांशी चर्चा करणार असल्याचे दोडके यांनी सांगितले. यावेळी चेंबरचे कार्यकारिणी सदस्य गजानंद गुप्ता, मनोज लटुरिया, हुसेन अजानी आदी उपस्थित होते.