दिग्रसला महायुतीची मोटारसायकल रॅली ठरली ऐतिहासिक

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
- प्रचाराच्या झंझावाताने संजय देशमुख यांची हवा ओसरली

दिग्रस, 
Motorcycle Rally : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री संजय राठोड, माजी खासदार हेमंत पाटील व तालुक्यातील महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या पुढाकारात बुधवार, 24 एप्रिलला काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीची चांगलीच छाप पडली. प्रचाराच्या या झंझावाताने संजय देशमुखांची हवाच ओसरली. शहरातील शिवसेना पदाधिकार्‍यांकडून राजश्री पाटील यांच्या ‘धनुष्यबाणा’चा प्रचार गेल्या 10 दिवसांपासून अखंडपणे सुरू आहे. प्रचारासाठी शहरातील सर्व प्रभाग पिंजून काढल्याने सुशिक्षित व सुसंस्कृत उमेदवार राजश्री पाटील यांची दिग‘स शहरातील घराघरात नुसती ओळखच झाली नसून, शुक‘वार, 26 एप्रिलला राजश्री पाटील यांना उत्तम मतदान होण्याची खात्री अनेकांनी बोलून दाखवली.
 
 
y24Apr-Digras-Rally
 
Motorcycle Rally : प्रचाराच्या अंतिम दिवशी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अपेक्षित सं‘येच्या दुप्पट शिवसैनिक मोटारसायकल घेऊन सकाळी 10 वाजता येथील भास्करवार प्रांगणात उपस्थित झाले. संजय राठोड यांचे आगमन होताच शिवसैनिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’चा जोरदार जयघोष केला. माजी खासदार हेमंत पाटील व राजश्री पाटील यांचे आगमन होताच उपस्थित शिवसैनिकात जोश संचारला आणि ही भव्य मोटारसायकल रॅली निघाली. शहरातील श्री घंटीबाबाचे दर्शन घेऊन आर्णी नाका, छत्रपती संभाजीनगर, श्री दुर्गामाता चौक, श्री शनिमंदीर, होल्टेकपुरा, शंकर टॉकीज, देवनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने रॅलीने मार्गक‘मण केले. रॅलीदरम्यान हेमंत पाटील यांनी लाऊडस्पीकरद्वारे रस्त्याने उभे असलेल्या लोकांचे नाव घेत महायुतीला मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. या मोटारसायकल रॅलीने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडून एक ऐतिहासिक रॅली म्हणून नुसती नोंदच केली एवढेच नसून संजय देशमुख यांची हवाच ओसरून टाकली.