नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेच

24 Apr 2024 19:35:49
- मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजय बोरस्तेंचा दावा
 
मुंबई, 
NashikLok Sabha : नाशिक मतदारसंघात लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट केले. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी बैठक झाली. यावेळी गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, असे बोरस्ते यांनी बुधवारी सांगितले.
 
 
Hemant Godse
 
NashikLok Sabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. अशातच मंगळवारी रात्री शिवसेना पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली होती. यात त्यांनी नाशिकची उमेदवारी शिवसेनेला मिळणार असल्याचे सांगितले. विद्यमान खासदार गोडसे यांचे नाव लवकर जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे बोरस्ते म्हणाले. सर्वांच्या संमतीने गोडसे यांचे नाव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. नाशिकची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उबाठाचे अनेक नेते बिनशर्त शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा बोरस्ते यांनी केला.
Powered By Sangraha 9.0