जातनिहाय जनगणना कोणीही रोखू शकत नाही

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
- राहुल गांधी यांचे प्रतिपादन
 
नवी दिल्ली, 
जातनिहाय जनगणना करण्यापासून देशातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. स्वत:ला देशभक्त म्हणणार्‍यांना जनगणनेत स्वारस्य नाही. मात्र आमच्यासाठी जातनिहाय जनगणना हा राजकारणाचा विषय नसून 90 टक्के जनतेला अधिकार मिळवून देण्यासाठीचा लढा असल्याचे काँग्रेस नेते Rahul Gandhi राहुल गांधी म्हणाले.
 
 
Rahul Gandhi
 
राजधानी दिल्लीत समृद्ध भारत फांऊडेशनच्या वतीने जवाहर भवन येथे सामाजिक न्याय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना सत्ताधार्‍यांवर टीका करताना राहुल म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा दुर्बल, गरीब आणि वंचितांना न्याय मिळवून देणारा आहे. मात्र पंतप्रधान मोदी आमच्या जाहीरनाम्याला घाबरतात. जातनिहाय जनगणना माझ्या जीवनाचे मिशन आहे. काँग्रेसचे सरकार स्थापन होताच पहिला निर्णय जातनिहाय जनगणनेचा घेतला जाईल. मोदी सरकारने निवडक व्यावसायिकांना 16 लाख कोटी हस्तांतरित केले तर आम्ही त्यांच्याकडून रक्कम परत मिळवून ती देशातील 90 टक्के वंचित लोकांना देणार आहे. आजही या लोकांचे अर्थव्यवस्था व न्यायपालिकेत स्थान नसल्याचे Rahul Gandhi राहुल गांधी यांनी सांगितले.
दलित, ओबीसींचे अस्तित्वच नाही
माध्यमे, न्यायपालिकेत दलित व ओबीसी वर्ग दिसतच नाही. उच्च न्यायालयात 650 न्यायाधीश आहे. त्यातील केवळ 100 ओबीसी न्यायाधीश आहेत. मोदी म्हणतात देशात केवळ श्रीमंत आणि गरीब या दोनच जाती आहेत. मात्र, यावर आमचा आक्षेप आहे. श्रीमंतांच्या जाती काढून पाहाव्या. गरिबांमध्ये दलित, ओबीसी बहुतांश निघतील, असा टोला यावेळी Rahul Gandhi राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.