चला लोकशाहीचा उत्सव साजरा करूया

    दिनांक :24-Apr-2024
Total Views |
- एडेड परिवाराचा आगळावेगळा मतदानजनजागृती उपक्रम

दारव्हा, 
ST Bus Selfie Point : यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणूक शुक‘वार, 26 एप्रिलला होत आहे. महसूल विभागाच्या वतीने मतदान जनजागृतीचे काम वेगात सुरू आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार रवी काळे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, मु‘याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या मार्गदर्शनात विरजी भिमजी घेरवराचे प्राचार्य सुरेश निमकर व श्याम पांडे यांच्या संकल्पनेतून आगळावेगळा मतदार जनजागृती उपक‘म राबवण्यात आला. एसटी बसचा सेल्फी पॉइन्ट करण्यात आला. अनेक जण या सेल्फी पॉइन्टमधील बसमध्ये आपला सेल्फी काढताना दिसत आहे. एसटी बसचे नाव ‘लोकशाहीचा उत्सव’ ठेवण्यात आले. ‘लोकशाही उत्सवाच्या या यात्रेला आम्ही निघालो.. तुम्हीही चला...’ असे या बसवर लिहिले आहे.
 
 
y24Apr-Lokshahi
 
ST Bus Selfie Point  : या सेल्फी पॉइन्टसाठी उमाबाई कणीकर कन्या विद्यालयाच्या मु‘याध्यापक कल्पना धवने, पर्यवेक्षक दयाराम साखरकर व सोमेश्वर चिरडे, सुनील निमकर, लक्ष्मण नवरंगे यांचे सहकार्य लाभले. या एसटी बसवर जनजागृतीचा संदेश लिहिला आहे. मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, सारे काम छोड दो, सबसे पहिले वोट दो, बूढा हो या जवान सभी करे मतदान, अशा घोषणा देत एडेड परिवाराने सहायक निवडणूक अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात मतदार जनजागृती करता रांगोळी, निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, मतदार जनजागृतीसाठी शहरातून रॅली, विद्यार्थ्यांनी लिहिलेले संकल्पपत्रही लोकांपर्यंत पोचवण्यात आले. एडेड परिवाराच्या मतदार जनजागृती सेल्फी पॉइन्टची शहरात चांगली चर्चा आहे.