मोदी सरकारचे कार्य सर्वस्पर्शी

24 Apr 2024 16:19:42
पुलगाव
Modi government "केंद्रातील मोदी सरकारने समाजातील सर्व घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला. समाजाच्या मूलभूत गरजा ज्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधीच पूर्ण झाल्या नाही. त्या गरजांची पूर्ती करून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या राजवटीत झालेला आहे. ", असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महायुतीचे उमेदवार रामदास तडस त्यांच्या प्रचारार्थ पुलगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
 

modi gav 
 
खालील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे पार पडलेल्या त्या प्रचंड जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मोदीजींनी ज्यांना घर नव्हते अशा वीस कोटी लोकांना पक्के घर उपलब्ध करून दिले. ज्यांच्या घरी स्वयंपाकाचा गॅस नव्हता, अशा 40 कोटी लोकांना उज्वला गॅस च्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून दिला. 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारत च्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. उद्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसलेल्या सात कोटी लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. मुद्रा कर्जाच्या माध्यमातून 55 कोटी बेरोजगारांना स्वतःचा उद्योग उभारण्यास सहाय्य केले. बचत गटातील महिलांना मोठ्या प्रमाणावर मदत केली. वर्धा जिल्हा चाळीस हजार महिलांनी बचत गटाच्या मदतीचा लाभ घेतला. सर्व बँकांना निर्देश देऊन अनुसूचित जातीच्या व्यक्तींना कर्ज उपलब्ध करून देण्यास बाध्य केले. शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडून वर्षाला बारा हजार रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. बारा बलुतेदारांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून काही उपलब्ध केल्या जात आहे. अनेक ठिकाणी उपलब्ध नसलेले रस्ते, उड्डाणपूल यांचे निर्माण करून दळणवळणाची साधने उपलब्ध झाली आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर 4000 कोटीची मदत करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. आघाडी सरकारचे सर्व नेते आम्ही इंजिन आहे म्हणून सांगतात. इंजिन मध्ये कोणाला बसता येते का? यांचे इंजिनही बंद पडलेले आहे. त्यामुळे महाल युतीच्या विकासाच्या गाडीमध्ये बसण्यासाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांना प्रचंड बहुमताने विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मजबूत करावे, असे आवाहन केले. सभेमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, किरण उरकांदे, शिवसेना नेते अशोक शिंदे,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, रिपब्लिकन पक्षाचे नेते विजय आगलावे, माजी खासदार सुरेश वाघमारे, देवळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजेश बकाने, भाजप नेते सागर मेघे यांचेही समायोचित भाषण झाले. खासदार तडस, राजेश बकाने, नितीन बडगे यांनी देवेंद्रजीचे स्वागत केले. सभेला आलेल्या स्त्री-पुरुषांनी हातामध्ये कमळाचे चिन्ह धरलेले होते.Modi government अनेक वक्त्यांनी भाषणाची सुरुवात "भारत माता की जय"व "जय श्रीराम" च्या गजराने केली. सभागृह महिला व पुरुषांनी खचाखच भरलेले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सभागृहाबाहेर टाकलेल्या मांडवामध्ये बसून जाहीर सभेचा आस्वाद घ्यावा लागला. सभेचे संचालन आकाश दुबे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0